India Register 7th ODI Series Win In Home  ESAKAL
क्रीडा

IND vs NZ : मालिका विजयाची सप्तपदी! भारताने नंबर 1 न्यूझीलंडला चारली पराभवाची धूळ

अनिरुद्ध संकपाळ

India Register 7th ODI Series Win In Home : भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा सहस पराभव केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका आपल्या खिशात टाकली आहे. भारताचा हा मायदेशातील सातवा वनडे मालिका विजय आहे. याचबरोबर भारताने आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा पराभव करण्याची किमया केली आहे.

भारताची डिसेंबर 2019 पासूनची मायदेशातील वनडे मालिकेतील कामगिरी

वेस्ट इंडीजचा 2 - 1 असा पराभव

ऑस्ट्रेलियाचा 2 - 1 असा पराभव

इंग्लंडचा 2 - 1 असा पराभव

वेस्ट इंडीजचा 3 - 0 असा पराभव

दक्षिण आफ्रिकेचा 2 - 1 असा पराभव

श्रीलंकेचा 3 - 0 असा पराभव

न्यूझीलंडचा 2 - 0 असा पराभव (मालिकेतील एक सामना अजून शिल्लक आहे.)

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 109 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. भारताकडून रोहित शर्माने 50 चेंडूत 51 धावांची दमदार खेळी केली. तर शुभमन गिलने नाबाद 40 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर 21व्या षटकातच शिक्कामोर्तब केले.

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला अवघ्या 108 धावात गुंडाळले. रायपूरच्या फ्रेश विकेटवर भारतीय वेगवान गोलंदाजांनी किवींची अवस्था 5 बाद 15 धावा अशी केली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी सुरूवातीला किवींना धक्के दिले.

त्यानंतर ग्लेन फिलिप्सने आधी मायकेल बार्सवेल आणि नंतर मिचेल सँटनरसोबत छोटी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर यांनी न्यूझीलंडची मधील फळी कापून काढली. त्यांना वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी चांगली साथ देत शेपुट गुंडाळात किवींचा डाव 108 धावात संपवला.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT