india series against australia
india series against australia saka
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेत 'या' पाच खेळाडूंवर जगाची नजर

Kiran Mahanavar

India vs Australia 2022 : विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. टीम इंडिया प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. तर मालिकेतील शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ 25 सप्टेंबरला हैदराबादमध्ये आमनेसामने येतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 'या' पाच खेळाडूंवर जगाची नजर असणार आहे.

Virat Kohli

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक 2022 मध्ये शानदार कामगिरी केली होती. विराट कोहलीने आशिया कप 2022 च्या 5 सामन्यात 276 धावा केल्या, त्याचवेळी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक ठोकले. विराट कोहली फॉर्मात आल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विश्वचषक 2022 आधी विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे.

Jasprit Bumrah

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाकडून खेळला नाही. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता, परंतु आता हा वेगवान गोलंदाज पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील.

Harshal Patel

हर्षल पटेलही दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करत आहे. हर्षल पटेल आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला या वेगवान गोलंदाजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खूप प्रभाव पाडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावल्यानंतर या फलंदाजाची बॅट आशिया कप 2022 मध्येही खूप बोलली. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Mohammed Shami

मोहम्मद शमीची 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. तेव्हापासून सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. याआधी मोहम्मद शमीची आशिया कपसाठीही भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार आहे. मोहम्मद शमी नवीन चेंडूवर विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मोहम्मद शमी कशी कामगिरी करतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid subvariant: चिंता वाढली! राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे 'इतके' रुग्ण आढळले, पुण्यात 51 तर ठाण्यात 20

Team India Racism : भारतीय क्रिकेट संघात होतोय वंशभेद..? वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासा

Health Tips : मधुमेहावर करायचीय मात तर हे पदार्थ असायलाच हवेत आहारात, लवकर फरक जाणवेल!

गोफण | भटकती आत्मा.. ऑफर नव्हे सल्ला! प्रकरण कोर्टात

Latest Marathi News Live Update : पॅरामोटरिंग करताना तरुणीचा अपघात

SCROLL FOR NEXT