India Tour of Zimbabwe
India Tour of Zimbabwe sakal
क्रीडा

Ind vs Zim: वेस्ट इंडिजनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्याचे शेड्यूल जाहीर!

Kiran Mahanavar

India Tour of Zimbabwe: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, त्यानंतर संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. विंडीज दौऱ्यानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेला जायचे आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही मंडळांनी सहमती दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे सामने 18, 20 आणि 22 ऑगस्टला खेळले जातील. (India set to tour Zimbabwe for three ODIs series in august)

भारतीय संघ सहा वर्षांनंतर झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 2016 मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला होता. तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांसाठी हा दौरा करण्यात आला होता. या दौऱ्यात फक्त एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. भारताच्या ब संघाने आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळली. भारताचा ब संघही झिम्बाब्वे दौऱ्यावर जाऊ शकतो. या मालिकेत 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी राखीव खेळाडूंची कामगिरी तपासली जाऊ शकते.

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेत व्यस्त आहे. भारताचा इंग्लंड दौरा 17 जुलै;ला संपणार आहे. इंग्लंडनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्यांना तीन वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. विशेष म्हणजे टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळले जाणार आहे. वेस्ट इंडिजचा हा दौरा 22 जुलैपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 7 ऑगस्टला होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून, त्यानंतर भारतीय संघ आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. आशिया चषकमध्ये भारताचा 28 ऑगस्टला पाकिस्तानशी सामना होणार आहे. यावेळी आशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT