Manu Bhaker | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic Manu Bhaker: 'मला आता जेवायचंय...', तिसरं पदक हुकल्यानंतर मनू भाकर काय म्हणाली? आईसाठीही दिला खास संदेश

Manu Bhaker Statement: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक हुकल्यानंतर मनू भाकरने आईसाठी खास संदेश दिला आहे.

Pranali Kodre

Manu Bhaker Statement: भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने तिचं नाव ऑलिम्पिक इतिहासात नोंदवलं आहे. तिला शनिवारी (३ ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक जिंकण्याची संधी होती. तिने शनिवारी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी खेळली. मात्र ती चौथ्या क्रमांकावर राहिल्याने तिचं पदक थोडक्यात हुकलं.

अंतिम फेरीत हंगेरीच्या कॅमिलीबरोबर झालेल्या शुटऑफमध्ये तिला पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे ती चौथ्या क्रमांकावर राहिली. दरम्यान, तिने यापूर्वी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिला आणि मिश्र गटात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.

पण त्यानंतर आता तिसऱ्या पदकाचीही तिला संधी होती. पण दे न मिळाल्याने ती काहीशी निराश झाली. पण असं असलं तरी तिनं पुढच्यावेळी आणखी जोमात पुनरागमन करेल असं निर्धार व्यक्त केला. याबरोबर आता ती ब्रेकदरम्यान काय करणार हे देखील सांगितलं, तसेच आईसाठी खास संदेश दिला आहे.

मनू भाकरच्या आता पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्व स्पर्धा संपल्या आहेत. त्यामुळे ती तिचे दोन पदकं घेऊन मायदेशी परतणार आहे.

जिओ सिनेमाशी बोलताना तिने ब्रेकदरम्यान आता काय करणार याबद्दल सांगितले. तिने सांगितलं, 'मी कदाचीत आता पहिले जेवेल. गेल्या काही दिवसात मी जेवू शकलेले नाही. मी नाश्ताकरून मग दिवसभरत रेंजमध्ये सराव करात होते आणि मग रात्री जेवण व्हायचं.'

त्याचबरोबर आईला खास संदेश देताना ती म्हणाली, 'तिचे खूप आभार. तिने माझ्यासाठी खूप त्याग केलेत, ज्यामुळे मी चांगली खेळू शकेल. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती निरोगी रहावी आणि तिला दीर्घायुष्य मिळो.'

याबरोबरच तिसरं पदक हुकल्याबद्दल मनू म्हणाली, 'मी आता पुढच्या ऑलिम्पिकचा विचार करत आहे. मी शेवटच्या शॉटवेळी खरंच नर्वस झाले होते. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत होते, पण ते पुरेसं नव्हतं. चौथं स्थान नक्कीच चांगलं स्थान नाही.'

'मी सध्या सोशल मीडियाही वापरत नाहीये, माझ्या फोनही पाहात नाहीये. मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकारात मी माझे सर्वोत्तम नाही देऊ शकले.'

याशिवाय तिच्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांचेही तिने आभार मानले, तिने प्रशिक्षक जसपाल राणा, क्रीडा मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुटुंब आणि मित्रपरिवाराचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT