Sonam Uttam Maskar | ISSF World Cup Sakal
क्रीडा

आता ऑलिंपिकमध्ये अचूक लक्ष्य साधायचंय! ISSF World Cup मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या सोनम मस्करचे लक्ष्य

Sonam Maskar sets eyes on Olympic medal: नेमबाजी विश्‍वकरंडकातील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या सोनम मस्कर हिने आता ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं स्वप्न असल्याचे म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जयेंद्र लोंढे -

यंदा तीन आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये तीन पदके पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या सोनम मस्कर हिने नवी दिल्लीत मंगळवारपासून सुरू झालेल्या नेमबाजी विश्‍वकरंडकातील महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.

मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या या कन्येशी दैनिक ‘सकाळ’ने याप्रसंगी संवाद साधला. याप्रसंगी तिने आता पुढील ऑलिंपिकमध्ये अचूक निशाणा साधण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर असल्याचे सांगितले.

आई-वडील, एक बहीण व एक भाऊ असे सोनमचे कुटुंब. वडिलांचा मुंबईत दुधाचा व्यवसाय. बहीण आर्किटेक्ट असून भावाने हॉटेल मॅनेजमेंट केले आहे. सोनम हिची २०१८मध्ये नेमबाजी या खेळाकडे पावले वळली; मात्र अवघ्या सहा वर्षांमध्ये तिने या खेळामध्ये उत्तुंग झेप घेतली. कोल्हापूर येथील राधिका बराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नेमबाजीचे बारकावे आत्मसात केले.

रेल्वेमध्ये नोकरी

नेमबाजी विश्‍वकरंडकात रौप्यपदक पटकावल्यानंतर सोनम हिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबासह, प्रशिक्षक व राष्ट्रीय संघटना, साई व ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट या प्रायोजकांना दिले.

या वर्षी ती पश्‍चिम रेल्वेशी जोडली गेली. अन्‌ याच वर्षी तिने ज्युनियर विश्‍वकरंडकात सुवर्ण, विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले हे विशेष.

अंतिम फेरीत कोणतेही दडपण घेतले नाही. पदक जिंकण्याचा दबावही नव्हता. फक्त सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विश्‍वास मनामध्ये होता. त्यामुळे अचूक लक्ष्य साध्य करता आले.
सोनम मस्कर

फ्रान्सच्या खेळाडूला मागे टाकले

भारताची सोनम मस्कर व फ्रान्सची ओशियने म्युलर या दोघींमध्ये अंतिम फेरीत पदकासाठी चढाओढ होती. सोनम हिने १९व्या शॉटमध्ये १०.७ गुण कमवले. त्यानंतर २०व्या शॉटमध्ये १०.९ गुणांची कमाई केली. या शॉटनंतर सोनमचे २१०.८ गुण झाले. म्युलरचे (१०.५ व १०.३) या दोन शॉटनंतर २१०.३ गुण झाले.

यानंतर सोनमने २३१.५ गुणांसह पुढे वाटचाल केली. याचवेळी म्युलरला सुवर्ण व रौप्यपदकापासून दूर राहावे लागले; पण तिचे ब्राँझपदक निश्‍चित झाले. चीनच्या युतिंग ह्युअँग २५४.५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. सोनमने २५२.९ गुणांसह रौप्यपदक जिंकले. दरम्यान, पात्रता फेरीत सोनम ही चौथ्या स्थानावर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT