Maheshwari Chauhan and Anant Jeet Singh | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: १ गुणाने हरलो! भारताच्या पदकावर चिनी आक्रमण; महेश्वरी-अनंतजीतची कडवी टक्कर

Maheshwari Chauhan-Anant Jeet Singh Lost Bronze Medal: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीतील स्किट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग यांचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं.

Pranali Kodre

India vs China Bronze Medal match in Skeet Mixed Team: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी (५ ऑगस्ट) नेमबाजीतील स्कीट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

कांस्य पदकाच्या लढतीत महेश्वरी आणि अनंतजीत यांना चीनची जोडी यिटींग जियांग आणि जियानलीन ल्यू यांनी अवघ्या एका पाँइंटच्या फरकाने पराभूत केलं. या लढतीत चीनच्या जोडीने ४४ पाँइंट्स मिळवले,तर भारताच्या जोडीला ४३ पाँइंट्स मिळाले.

अखेरपर्यंत या दोन्ही जोड्यांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली होती. मात्र अखेरच्या क्षणी चीनने बाजी मारली आणि भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील चौथं पदक थोडक्यात हुकलं.

जर महेश्वरी आणि अनंतजीत यांनी पदक जिंकलं असतं, तर भारताचं हे स्किट प्रकारातील पहिलंच ऑलिम्पिक पदक ठरलं असतं. दरम्यान, आता या दोघांचंही पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपलं आहे.

यापूर्वी महेश्वरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वैयक्तिक स्कीट प्रकारातही सहभागी झाली होती. पण क्वालिफिकेशनमध्ये १४ व्या क्रमांकावर राहिली होती, तर अनंतजीतही पुरुषांच्या वैयक्तिक स्कीट प्रकारात २४ व्या क्रमांकावर राहिला होता.

क्वालिफायर्समध्ये चमकदार कामगिरी

सोमवारी महेश्वरी आणि अनंतजीत यांनी स्कीट प्रकारात मिश्र गटाच्या क्वालिफायर्समध्ये चमकदार कामगिरी करत कांस्य पदकाच्या सामन्याची पात्रता मिळवली होती. त्यांनी चीनच्या जोडीसह संयुक्तरित्या तिसरा क्रमांक मिळवला होता.

भारत आणि चीन यांनी प्रत्येकी १४६ पाँइंट्स मिळवले होते. त्यामुळे नियमानुसार तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील जोड्या कांस्य पदकासाठी खेळणार होत्या. यामुळे भारत आणि चीन यांच्यात कांस्य पदकाचा सामना झाला होता.

दरम्यान या क्वालिफायर्समध्ये १४९ पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर इटलीचे डियाना बाकोस आणि ग्रॅब्रिएल सोझेटी राहिले, तर अमेरिकेचे ऑस्टन जेवेल स्मिथ आणि विन्सेंट हाँकॉक हे १४८ पाँइंट्सह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे इटली आणि अमेरिका यांच्यात सुवर्ण पदकाचा सामना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT