Team India File Photo
क्रीडा

WTC : 15 पैकी 6 जण टीम इंडियाच्या प्लेइंग XI मध्ये फिक्स!

रोहित शर्मासोबत शुभमन गिली भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करेल, हे जवळपास फिक्स आहे.

सुशांत जाधव

India squad for WTC final : न्यूझीलंड संघानंतर भारतीय संघानेही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात हनुमा विहारी आणि मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. दुसरीकडे केएल राहुल, मयांक अग्रवाल, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना बाकावर बसवण्यात आले आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत शुभमन गिली भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करेल, हे जवळपास फिक्स आहे.

या दोघांशिवाय चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत (विकेट किपर) या 6 जणांची प्लेइंग इलेव्हनमधील जागा निश्चित मानली जाते. रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी, उमेश यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्यातून कोणत्या पाच जणांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वृद्धिमान साहा हा बॅकअप विकेट किपर असून तो बाकावरच बसल्याचे पाहायला मिळेल.

असा आहे 15 सदस्यीय भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी एसटी आगार मालामाल! दिवाळीत १ कोटी १२ लाख उत्पन्न जमा

Body Impact Less Sleep: तुम्हीही रात्री फक्त 2 तास झोपताय? जाणून घ्या शरीरावर काय परिणाम होतात

Honesty Story : 'ओवीने प्रामाणिकपणे परत केला सुवर्णहार'; खेळताना सापडला पाच तोळे सोन्याचा हार

Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT