india squad womens asia cup announced harmanpreet kaur to lead cricket sakal
क्रीडा

Women's T20 Asia Cup : हरमनप्रीतकडेच भारतीय महिला संघाचे नेतृत्व

महिलांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेसाठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिलांच्या ट्वेन्टी-२० आशिया क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर कायम ठेवण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघच या वेळी कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय महिला संघात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, के. पी. नवगिरे व राधा यादव या खेळाडूंचा समावेश आहे. स्मृती मानधना महाराष्ट्राच्या संघातून खेळत होती. के. पी. नवगिरे हीदेखील महाराष्ट्राच्या संघातून खेळली; पण पुरेशी संधी मिळत नसल्यामुळे तिला नागालँड संघाचे प्रतिनिधीत्व करावे लागले. जेमिमा रॉड्रिग्स ही मुंबई संघातून खेळत आहे. तसेच राधा यादवही याआधी मुंबईतून खेळत होती; पण आता ती बडोद्या संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे.

१५ ऑक्टोबरला जेतेपदाचा फैसला

अखिल भारतीय महिला निवड समितीने बांग्लादेशमधील ‘सिल्हेट’मध्ये १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महिलांच्या आशिया क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आशियाई करंडकात सात देशांचा समावेश आहे. यजमान बांगलादेशसह भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया व अमिराती हे देश जेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांना झुंज देणार आहेत. साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहोचतील. १३ ऑक्टोबरला उपांत्य फेरीच्या लढती होतील.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा फैसला १५ ऑक्टोबरला होणार आहे. श्रीलंकेत या स्पर्धेचे दोन वेळा आयोजन करण्यात आले आहे. भारत व पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी एक वेळा ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये प्रथमच ही स्पर्धा होणार आहे.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, एस. मेघना, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि के. पी. नवगिरे. राखीव खेळाडू ः तानिया भाटिया आणि सिमरन दिल बहादूर.

सहा वेळा जेतेपदाचा मान

  • भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रिकेट करंडकामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

  • आतापर्यंत झालेल्या सातपैकी सहा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावण्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.

  • पहिल्या चार सत्रांमध्ये ही स्पर्धा एकदिवसीय क्रिकेटच्या रुपात खेळवण्यात आली. पण २०१२पासून टी-२०रुपात खेळवण्यात येत आहे.

  • बांगलादेशचा महिला संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. २०१८मध्ये मलेशियामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT