Yuzvendra-Chahal
Yuzvendra-Chahal 
क्रीडा

भारतीय संघात नसला म्हणून काय झाले? युझवेंद्र चहल करतोय कमाल 

वृत्तसंस्था

तिरुआनंतपूरम  - मुंबईकर शिवम दुबे तसेच अक्षर पटेल यांची आक्रमक अर्धशतके आणि युझवेंद्र चहलचे पाच विकेट यामुळे भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 69 धावांनी शानदार विजय मिळवला. ही पाच सामन्यांची मालिका आहे. 

प्रत्येकी 47 षटकांच्या सामन्यात भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 327 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका अ संघाला 45 षटकांत 258 धावांत गुंडाळले. विराट कोहलीच्या भारतीय कसोटी संघात स्थान नसलेल्या चहलने येथे मात्र कमाल दाखवली. 47 धावांत निम्मा संघ गुंडाळला. 

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्या अगोदर काही प्रमुख खेळाडू त्यांच्या अ संघातून भारतात खेळत आहे. रेझा हेन्रिक्‍स, ब्युरन हेन्रिक्‍स, तेम्बा बावूमा, ज्युनियर डाले या खेळाडूंचा त्यात समावेश आहे. 

दक्षिण आफ्रिका अ संघातून सलामीवीर रेझा हेन्रिक्‍सने 108 चेंडूत 110 धावांची खेळी केली त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज क्‍लासेनने अर्धशतक केले पण चहलची फिरकी त्यांना भारी ठरली. 

त्या अगोदर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत अ संघातून शुभमन गिल, मनिष पांडे, इशान किशन यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही त्यामुळे भारताची 36 षटकांत 6 बाद 206 अशी अवस्था झाली होती. मात्र शिवम दुबे (60 चेंडूत 79) आणि अक्षर पटेल (36 चेंडूत 60) यांच्या आक्रमणामुळे भारताने 327 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक - भारत अ - 47 षटकांत 6 बाद 327 (शुभमन गिल 46 -47 चेंडू, 7 चौकार, मनिष पांडे 39 -41 चेंडू, 4 चौकार, इशान किशन 37 -32 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, शिवम दुबे नाबाद 79 -60 चेंडू, 3 चौकार, 6 षटकार, अक्षर पटेल नाबाद 60 -36 चेंडू, 6 चौकार, 3 षटकार, ब्युरन हेन्रिक्‍स 2-89, बिजॉर्न फॉर्टिन 2-40) वि. वि. दक्षिण आफ्रिका अ ः 45 षटकांत सर्वबाद 258 (रेझा हेन्रिक्‍स 110 -108 चेंडू, 12 चौकार, 1 षटकार, हेन्रिक क्‍लासेन 58 -43 चेंडू, 4 चौकार, 3 षटकार, खलील अहमद 1-32, युझवेंद्र चहल 5-47, अक्षर पटेल 2-39)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT