India Tejaswin Shankar Won Bronze Medal In High Jump In Commonwealth Games ESAKAL
क्रीडा

CWG 2022 : ऐतिहासिक कांस्य पदकी 'तेजस्वि'न उंच उडी; दिल्ली HC मुळे मिळाले होते संघात स्थान

अनिरुद्ध संकपाळ

CWG 2022 : उंच उडीत भारताच्या तेजस्विन शंकरला (Tejaswin Shankar) कांस्य पदक (Bronze Medal) पटकावले. त्याने 2.22 मिटर उंच उडी मारत कांस्य पदकाला गवसणी घातली. उंची उडीत राष्ट्रकुल पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. भारताने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेले हे पहिले ट्रॅक अँड फिल्डमधील पदक आहे. तेजस्विनने पहिल्या प्रयत्नात 2.10 मिटर उंच उडी मारली. त्यानंतर त्याने 2.15 मीटर उंच उंडी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखवली. विशेष म्हणजे शंकरला अखेरच्या क्षणी संघात स्थान मिळाले होते. तेही दिल्ली उच्च न्यायायलाच्या आदेशामुळे! शंकरची या हंगामातील सर्वोत्तम उंच उडी ही 2.27 मीटर इतकी होती. तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ही 2.29 मीटर इतकी आहे.

शंकरने तिसऱ्यावेळी 2.19 मीटर उंच उडी मारण्याचा पहिला प्रयत्न केला. तो पहिल्या प्रयत्नातच 2.19 मीटर उंच उंडी मारण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो पदकांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने 2.22 मीटर उंच उडी मारत आपले आव्हान कायम ठेवले. दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडचा हामिश केर आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रँडन स्टार्क यांनी देखील दमदार उंची उडी मारत पदकांच्या शर्यतीत आघाडी मिळवली.

केर आणि स्टार्क यांनी 2.25 मीटर उंच उडी मारत सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आघाडी घेतली. मात्र तेजस्विन शंकरला 2.25 मीटर उडी मारण्यात यश आले नाही. त्याने दोन वेळा 2.25 मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा प्रयत्न फसला. अखेर शंकरने 2.28 मीटर उंच उडी मारण्याचा शेवटचा प्रयत्नही करून सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT