SA vs IND esakal
क्रीडा

SA vs IND : भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिका म्हणजे 31 वर्षापासूनचा अभेद्य किल्ला... यंदा हा इतिहास बदलणार?

कसं आहे भारतीय संघाचं दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील ट्रॅक रेकॉर्ड

अनिरुद्ध संकपाळ

South Africa vs India Test Record : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील तीन टी 20 सामन्यांच्या मालिका भारताने 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली. तर वनडे मालिकेत 2 - 1 असा विजय मिळवला. आता भारतीय संघ 26 डिसेंबर पासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 आणि वनडे मालिकेतील दमदार कामगिरीनंतर भारतीय संघ आता कसोटीत देखील तोच कित्ता गिरवण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय कसोटी संघावर नजर टाकली तर संध्याचा संघ हा तगडा वाटतोय. मर्यादित षटकांच्या मालिकेत संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यामुळे कसोटी संघातील अनेक खेळाडू हे फ्रेश असणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील संघात परतणार आहेत. वनडे संघातील फक्त 4 खेळाडू कसोटी संघात असणार आहेत.

मात्र भारतासाठी दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात पराभूत करणे इतके सोपे नाही. गेल्या 2022 च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला 2 - 1 असा पराभव सहन करावा लागला होता. या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी यंदा आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत 1992 - 93 पासून खेळतोय. मात्र कसोटीत भारताला दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायदेशात पराभूत करणं जमलेलं नाही.

भारतीय संघाने 1993 पासून 8 वेळा कसोटी मालिका खेळली आहे. या आठ मालिकांमध्ये भारताने 2010 - 11 मध्येच सर्वात चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी भारतीय संघ कसोटी मालिका ड्रॉ करण्यात यशस्वी ठरला होता. मात्र यंदाच्या कसोटी संघात तगडे गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघ यंदा इतिहास बदलण्याची शक्यता वाढली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

Mumbai News: एकुलती एक मुलगी, १६ वर्षे कोमात, ३७ लाख भरपाई देण्याचे आदेश; वेदनांची भरपाई पैशात होणार नाही !

Adani समूह आता स्मार्ट मीटर कंपनी विकत घेण्याच्या तयारीत; 1500 कोटींची डील होण्याची शक्यता...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune News: दूषित पाण्यामुळे आरोग्याशी खेळ! कात्रजमध्ये पाणीपुरवठा विभागाचा गोंधळ; जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीटंचाई आणि दूषित पाणी

SCROLL FOR NEXT