India third ODI  
क्रीडा

Eng vs Ind : सगळे शेर ढेर झाले असताना पंत-पांड्या इंग्रजांना भिडले

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला I

Kiran Mahanavar

IND vs ENG ODI : ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यातील विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत सर्वबाद 259 धावांवर ऑल आउट झाला. प्रत्युत्तरात भारताने 42.1 षटकांत 5 बाद 261 धावा करून सामना हा जिंकला.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रिसे टॉप्लीने पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्के दिले. शिखर धवन एक धाव काढून बाद झाला. रोहित शर्मा 17 तर विराट कोहली 17 या आघाडीच्या फलंदाजांना ३८ धावांवर रिसे टॉप्लीने बाद केले. सूर्यकुमार यादवने 16 धावा केल्या. त्यानंतर रिषभ व हार्दिक पांड्या सहजतेने धावा करताना दिसल्याने भारतीय चाहत्यांना आशेचा किरण दिसला. हार्दिक पांड्या 55 चेंडूत 71 धावा काढून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. त्याने ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली आणि भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

टीम इंडियासमोर इंग्लंडची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरत आहे. झटपट धावा काढण्याच्या नादात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. भारताने मालिकेत इंग्लंडला सलग तिसऱ्यांदा ऑलआऊट केले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयने 41, मोईन अलीने 34, क्रेग ओव्हरटनने 32 आणि बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27-27 धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. हार्दिकच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT