India Tour of South Africa 
क्रीडा

India Tour of South Africa : 10 डिसेंबरपासून रंगणार भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Kiran Mahanavar

India Tour of South Africa 2023 Full Schedule : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला आफ्रिकेत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारताचा आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. येथे जाणून घ्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक....

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. संघाची घोषणा आज म्हणजेच गुरुवार 30 नोव्हेंबरला होऊ शकते. अहवालानुसार, 2024 च्या वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूंची निवड होऊ शकते त्यांनाच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळेल.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर तिची सुरुवात तीन सामन्यांच्या T20 मालिकेने होणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील आणि शेवटी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 10 डिसेंबरला होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 10 डिसेंबरला डर्बन येथे खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 12 डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जाईल आणि तिसरा आणि शेवटचा टी-20 जोहान्सबर्ग येथे 14 डिसेंबर रोजी खेळला जाईल.

यानंतर 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे, दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबरला सेंट जॉर्ज पार्क येथे आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळला जाईल.

यानंतर 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. दुसरी टेस्ट 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी-20- 10 डिसेंबर

  • दुसरा टी-20- 12 डिसेंबर

  • तिसरा टी-20- 14 डिसेंबर

  • पहिला एकदिवसीय - 17 डिसेंबर

  • दुसरी वनडे- 19 डिसेंबर

  • तिसरी एकदिवसीय- 21 डिसेंबर

  • पहिली कसोटी- 26-30 डिसेंबर

  • दुसरी कसोटी- 3-7 जानेवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममता बॅनर्जी कोलकाता हायकोर्टात दाखल, भवानीपूरच्या निकालाविरोधात दाखल केली याचिका, पश्चिम बंगालमध्ये घडामोडींना वेग

‘हे गाणं प्रेग्नेंसीत रेकॉर्ड केलं होतं’ परिणीती चोप्राचं 'नमामी शमीशान' शिवभक्ती गीत चर्चेत, सोशल मीडियावर Viral Video

Latest Marathi News Live Update : शिवसेना अधिक बळकट होणार असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा

पुनर्वसनावरून केडीएमसी महासभेत खडाजंगी! "आमदारांसाठी एक आणि नगरसेवकांसाठी दुसरा नियम आहे का?" भाजप नगरसेवकांचा सवाल

Mumbai News: मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार; आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT