Virat Kohli And Rohit Sharma test 
क्रीडा

SA vs Ind Test Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून रोहित-विराटचा पत्ता कट, हा दिग्गज होणार कर्णधार?

Kiran Mahanavar

India Tour of South Africa 2023 Test Series : वेस्ट इंडिजनंतर टीम इंडियाला यावर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. जिथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्या जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवार 14 जुलै रोजी भारत दौरा जाहीर केला आहे.

26 डिसेंबरपासून सेचुरियनमध्ये कसोटी मालिका सुरू होणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत बीसीसीआयकडून युवा खेळाडूही पाहायला मिळतील.

ही मालिका यावर्षी डिसेंबरमध्ये सुरू होईल आणि जानेवारी 2024 पर्यंत खेळली जाईल. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान केपटाऊन येथे होणार आहे.(Team India tour of South Africa 2023-24 schedule)

वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय येत्या काही दिवसांत 15 सदस्यीय संघाची घोषणा करू शकते. ज्यामध्ये टीम इंडियाची कमान अजिंक्य रहाणेकडे सोपवली जाऊ शकते.

कारण यंदाचा विश्वचषक भारतात होणार आहे. ज्याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटला सतत क्रिकेट खेळल्यामुळे विश्रांती दिली जाऊ शकते. यशस्वी जैस्वालनंतर सरफराज खानची या आफ्रिका दौऱ्यावर निवड होऊ शकते. तर गोलंदाजीत नवदीप सैनी, मुकेश कुमार यांची निवड होऊ शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा संभाव्य खेळाडूचा संघ : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, मुकेश कुमार, आर अश्विन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: पडिक्कलने कोणालाच न जमलेला विक्रम केला, निवड समितीच्या नाकावर टिच्चून केली दमदार खेळी; मुंबईला फेकले स्पर्धेबाहेर

BJP Mumbai : मुंबईचा भूमीपुत्र, ‘मराठी माणूस’ मुंबईतच राहणार!',भाजपचा यशस्वी 'मास्टरप्लॅन'

Crime News : मुलाच्या निधनानंतर पैशाची हाव; सासऱ्याचं सुनेसोबत भलतंच कृत्य, महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?

Pune Crime : "पोलिसांत गेला तर जीपला बांधून वरात काढीन"; सावकाराची धमकी, लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT