Cheteshwar Pujara  esakal
क्रीडा

WI vs IND Test Squad : चेतेश्वर पुजाराचा पत्ता कट, ऋतुराज, यशस्वी संघात; कसोटी संघात झालेत मोठे बदल

अनिरुद्ध संकपाळ

WI vs IND Test Squad : भारत येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून भारतीय संघातून चेतेश्वर पुजाराला डच्चू मिळाला आहे. संघात यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना संधी मिळाली आहे.

भारताने WTC Final हरल्यानंतर कसोटी संघाचा आता चेहरा बदलण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विंडीज दौऱ्यावर विश्रांती देण्यात येईल आणि नवा कसोटी संघ उतरवला जाईल अशीही चर्चा होती. मात्र रोहित शर्मा फिट असून तो कसोटी खेळणार असल्याचे संघ जाहीर झाल्यावर सिद्ध झाले.

जरी रोहित शर्माच्या कसोटी संघातील स्थान अजून काही काळ तरी कायम राहील हे पक्के झाले असले तरी संघातील अजून एक वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजाराला WTC Final मधील सामन्यातील सुमार कामगिरीनंतर संघातून डच्चू मिळाला आहे.

भारताच्या या कसोटी संघात ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल या दोन आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याचबरोबर गोलंदाजी विभागात नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना कसोटी संघात स्थान मिळाले.

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैसवाल, अजिंक्य रहाणे, केएस भरत, इशान किशन, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025: बिहार निवडणूक! एनडीएमध्ये नाराजी? 'या' दोन पक्षांनी व्यक्त केली खदखद

Vaijapur News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणामुळे काहींचे स्वप्न राहणार अधुरे; काहींचे चेहरे खुलले

Uttar Pradesh : CM योगींकडून प्रेरणा घेऊन उभी केली ‘मोरिंगा आर्मी’ PM मोदींनीही केलं लखनऊमधील महिलेचे कौतूक

Pune News : अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्याची उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी

Wagholi News : कामगारांकडून बेदम मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू; ११ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT