IND vs AFG 1st T20 esakal
क्रीडा

IND vs AFG 1st T20 : कशी असेल रोहितची Playing 11; विराटच्या निर्णयामुळं कोणाचा होणार फायदा?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AFG 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेची सुरूवात उद्या ( दि. 11) मोहालीतून होत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषेदत प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहली पहिल्या सामन्याला मुकणार असे सांगितले. त्यामुळे आता जवळपास 14 महिन्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये परतणाऱ्या रोहित शर्मासमोर संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

विराट कोहली वैयक्तिक कारणामुळं पहिला सामना खेळणार नाहीये. त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये कोणाला संधी द्यायची हा प्रश्न रोहितसमोर आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला येणार आहेत. यावर खुद्द राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केलं.

मात्र विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याने तिसऱ्या क्रमांकावर कोण याबाबत रोहितला विचार करावा लागणार आहे. या जागेसाठी तिलक वर्मा आणि शुभमन गिल ही दोन नावे चर्चेत आहेत. याचबरोबर शुभमन गिलला तिसऱ्या आणि तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर देखील खेळवलं जाऊ शकतं. कारण सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे देखील ठरवावं लागेल.

रोहितची डोकेदुखी इथंच थांबत नाही. त्याला विकेटकिपर म्हणून जितेश शर्मा किंवा संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला खेळवायचं हे देखील निश्चित करायचं आहे. सहाव्या स्थानावर रिंकू सिंह फिनिशर म्हणून जवळपास निश्चित झाला आहे. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल फलंदाजीला येईल. त्यानंतर कुलदीप यादवला रवी बिश्नोईऐवजी संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांची वर्णी लागू शकते.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

  • रोहित शर्मा (कर्णधार)

  • यशस्वी जयस्वाल

  • शुभमन गिल

  • तिलक वर्मा

  • संजू सॅमसन / जितेश शर्मा

  • रिंकू सिंह

  • अक्षर पटेल

  • कुलदीप यादव

  • अर्शदीप सिंग

  • आवेश खान

  • मुकेश कुमार

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT