India vs Afghanistan 3rd T20 Playing 11 marathi news 
क्रीडा

Ind vs Afg : तिसऱ्या टी-20 सामन्यातून 'या' 3 खेळाडूंचा पत्ता कट, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी?

India vs Afghanistan T20 Series News | अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघात होणार 3 मोठे बदल?

Kiran Mahanavar

India vs Afghanistan 3rd T20 Playing 11 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून विराट कोहलीच्या आवडत्या मैदान चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

अशा स्थितीत विराटची तुफानी शैली आज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध पहिले दोन सामने जिंकले असले तरी आज भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो. आजच्या सामन्यातून 3 खेळाडू बाद होणार हे निश्चित मानले जात आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना खूपच रोमांचक होऊ शकतो. एकीकडे अफगाणिस्तान संघाला भारताविरुद्ध पहिला विजय नोंदवायचा आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी शेवटचा टी-20 सामना जिंकून आपला मजबूत दावा मांडण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय भारताने अफगाणिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळे हा इतिहासही कायम राखण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.

मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघातून 3 खेळाडूंना वगळले जाऊ शकते. या खेळाडूंना वगळण्यामागे मोठे कारण नाहीये. वर्ल्ड कपआधी संघ निवडीसाठी मदत होईल. जेणेकरून इतर खेळाडूंची कामगिरी देखील पाहता येईल. या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळू शकते. अद्याप एकाही सामन्यात या खेळाडूचा समावेश झालेला नाही, त्यामुळे जितेश शर्माला वगळून संजूला खेळवले जाऊ शकते.

दुसरा खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. रवी बिश्नोईच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो, जेणेकरून कुलदीपचा फॉर्मही कळू शकेल. तिसरा बदल आवेश खानच्या रूपाने पाहायला मिळतो. अर्शदीप किंवा मुकेश कुमारच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : 'मत चोरी'सारखे घाणेरडे शब्द वापरून खोटी विधाने करू नका; निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना सल्ला

Latest Marathi News Updates : २५ ऑगस्टला वनतारा माधुरी हत्तीणी प्रकरणाची पुढील सुनावणी होणार

IPL 2026: डेवॉल्ड ब्रेव्हिससाठी CSK ने अंडर द टेबल बरीच रक्कम दिली; आर अश्विनच्या दाव्याने खळबळ, फ्रँचायझीचा सौदा संशयाच्या भोवऱ्यात

Janmashtami Travel Tips: जन्माष्टमीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'या' हिल स्टेशनची सैर, मिळेल आनंद

Karad Crime: वाखाण भागात घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास, शहर पोलिसात फिर्याद दाखल

SCROLL FOR NEXT