India vs Australia 2nd ODI 
क्रीडा

IND vs AUS : स्टार्कचा पंजा! ओपनिंग जोडीनं 'स्टार्टर'मध्येच संपवली मॅच

Kiran Mahanavar

India vs Australia 2nd ODI : मुंबईत कसा तरी टीम इंडियाचा जीव वाचला, पण दोनच दिवसांत विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा खेळ खल्लास केला. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओपनिंग जोडीनं 'स्टार्टर'मध्येच मॅच संपवली. अवघ्या 55 मिनिटे आणि 66 चेंडूंमध्ये 10 गडी राखून पराभव केला.

अशा प्रकारे 3 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी झाली आहे. प्रथम, मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना रडवले. या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने 26 षटकात केवळ 117 धावा केल्या होत्या. डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्कने पाच बळी घेतल्या.

मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह कांगारू संघाने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत होणार आहे. तिसरा एकदिवसीय सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 11 षटकांत 121 धावा करत सामना जिंकला. मिचेल मार्शने 36 चेंडूत 66 आणि ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 51 धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने 10 चौकार मारले.

टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर भारताचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला. ना रोहित शर्मा चालला ना हार्दिक पांड्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना खातेही उघडता आले नाही. परिस्थिती अशी होती की 11 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले.

विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याचवेळी अक्षर पटेलने नाबाद 29 धावा करत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. रवींद्र जडेजाने 16 आणि रोहित शर्माने 13 धावा केल्या. केएल राहुल नऊ आणि हार्दिक पांड्या केवळ एक धाव करू शकले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच आणि शॉन अॅबॉटने तीन बळी घेतले. नॅथन एलिसला दोन यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT