india vs australia 2nd t20 weather thiruvananthapuram greenfield stadium rain will be cancelled  
क्रीडा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 होणार रद्द? तिरुवनंतपुरम मधील 'त्या' फोटोने वाढवले टेन्शन

Kiran Mahanavar

India vs Australia 2nd T20 Weather Thiruvananthapuram : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना 23 नोव्हेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली.

कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील टी-20 सामना 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे. दरम्यान, एका फोटोमुळे टेन्शन वाढवले आहे.

शनिवारी ग्रीनफिल्ड स्टेडियमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामन्याच्या एक दिवस आधी घेतलेले हे फोटो आहे, ज्यात खेळपट्टी कव्हर्सने झाकलेली आहे. एवढेच नाही तर मैदानात भरपूर पाणी साचलेले दिसत आहे. खरं तर तिरुवनंतपुरममध्ये पाऊस पडत आहे. शनिवारीही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

Accuweather च्या रिपोर्टनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाची शक्यता आहे. 26 नोव्हेंबरला तिरुवनंतपुरममध्ये पावसाची शक्यता 55 टक्के आहे. कमाल तापमान 32 अंश असेल. तर किमान तापमान 25 अंश से. दव पडण्याची शक्यता कमी आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडेल की नाही हे 26 नोव्हेंबरच्या संध्याकाळीच कळेल. जर पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर दोन्ही बाबतीत टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे असेल.

तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये आतापर्यंत केवळ 3 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ 1 सामना जिंकला आहे, तर पाठलाग करणाऱ्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे.

भारताने या मैदानावर दोनदा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये भारताला फक्त एकदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या तीन टी-20 मध्ये येथे सरासरी धावसंख्या 114 आहे. सूर्यकुमार यादव, रिंकू सिंगसारखे खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. अशा परिस्थितीत त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT