IND vs AUS 2nd Test esakal
क्रीडा

IND vs AUS 2nd Test : भारतीय संघाला शेवटच्या मिनिटाला सोडावे लागले हॉटेल; दिल्लीत नेमकं काय झालं?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला असून त्यांचा सराव देखील सुरू आहे. मात्र भारतीय संघाला ऐनवेळी आपले हॉटेल सोडून दुसरे हॉटेल शोधावे लागले.

भारतीय संघाने दिल्ली येथील आपले हॉटेल शेवटच्या मिनिटाला बदलले. कारण दिल्लीत जी 20 परिषद आणि लग्नाच्या हंगामामुळे पंचतारांकित हॉटेलमधील बऱ्याच रूम बुक आहेत. भारतीय संघ दिल्लीत सहसा ताज पॅलेस किंवा आयटीसी मयुरा हॉटेलध्ये थांबते. मात्र यावेळी त्यांनी ऐनवेळी हॉटेल बदलून नोएडा येथील लीला हॉटेलमध्ये थांबावे लागले. बीसीसीआय अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भारताची माजी कर्णधार विराट कोहली मात्र संघासोबत रहात नसून त्याने दिल्लीतील आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तो गुरूग्रामधील आपल्या घरात दोन चार दिवस राहणार आहे. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाची परवानगी देखील घेतली आहे. भारतीय संघ खूप कालावधीनंतर दिल्लीत कसोटी सामना खेळत आहे.

विराट कोहलीने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी संघासोबत न राहता घरी थांबण्याचा निर्णय घेतला. तो गेल्या दोन दिवसांपासून घरी राहतोय. विराट कोहली अनेक दिवसांनंतर दिल्लीत लाँग ड्राईव्ह एन्जॉय करतोय.

(Sports Latest News)

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे - शायना एनसी

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT