India Vs Australia After Three Years Nagpur Host International Cricket Match In Vidarbha Cricket Association Stadium ESAKAL
क्रीडा

India Vs Australia : तीन वर्षांनंतर रंगणार नागपुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा

नागपूर, ता. १० : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) क्रिकेट संघादरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरी लढत येत्या २३ सप्टेंबर रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे.

बीसीसीआयने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम घोषित केला. २० सप्टेंबरला मोहाली येथे पहिला सामना झाल्यानंतर २३ तारखेला नागपुरात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारे मेजवानी राहणार आहे. ४५ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या जामठा स्टेडियममध्ये आतापर्यंत १२ पुरुषांचे व दोन महिलांचे टी-२० सामने खेळले गेले आहेत. नागपुरात शेवटचा टी-२० सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये खेळला गेला होता.

जामठा स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium) आतापर्यंत झालेले टी-२० सामने

९-१२-०९ भारत-श्रीलंका श्रीलंका २९ धावा

८-३-१६ झिम्बाब्वे-हाँगकाँग झिम्बाब्वे १४ धावा

८-३-१६ अफगणिस्तान-स्कॉटलंड अफगणिस्तान १४ धावा

१०-३-१६ झिम्बाब्वे-स्कॉटलंड झिम्बाब्वे ११ धावा

१०-३-१६ हाँगकाँग-अफगणिस्तान अफगणिस्तान ६ गडी

१२-३-१६ अफगणिस्तान-झिम्बाब्वे अफगणिस्तान ५९ धावा

१२-३-१६ हाँगकाँग-स्कॉटलंड स्कॉटलंड ८ गडी

१५-३-१६ भारत-न्यूझीलंड न्यूझीलंड ४७ धावा

२५-३-१६ द. आफ्रिका-वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ३ गडी

२६-३-१६ अफगणिस्तान-वेस्ट इंडीज अफगणिस्तान ६ धावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT