India Vs Australia Women's 1st ODI Marathi News sakal
क्रीडा

IND W Vs AUS W : आता वनडे मालिका जिंकण्याचे लक्ष्य! सोळा वर्षाचा रेकॉर्ड हरमन काढणार मोडीत?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका आजपासून वानखेडेवर

Kiran Mahanavar

India Vs Australia Women's 1st ODI : सलग दोन प्रतिष्ठेच्या कसोटी सामन्यांत विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला संघाने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी कंबर कसली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज होत आहे.

पुढील काही दिवसांत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० मालिका होणार आहेत. एकदिवसीय मालिका वानखेडे स्टेडियवर आहे; तर टी-२० मालिका डी.वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला प्रथमच कसोटी सामन्यात आणि तेही तब्बल ३४७ धावांनी पराभूत केल्यामुळे भारतीय महिलांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. याचा फायदा मर्यादित षटकांच्या मालिकेत कसा केला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. परिणामी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.

असा आहे इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आत्तापर्यंत ५० एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यातील केवळ १० लढतीच भारताला जिंकता आल्या आहेत; तर ४० सामन्यांत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ५० मधील २१ लढतीत मायदेशात झाल्या. त्यातील केवळ चार सामन्यांत भारताला विजय मिळालेला आहे. २००७ पासून झालेल्या सात एकदिवसीय सामन्यांपैकी एकाही लढतीत भारताला विजय मिळालेला नाही.

वानखेडेवर मोठा पराभव

वानखेडे स्टेडियमवर मार्च २०१२ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला २२१ धावांच्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता; तर पुढच्या दोन लढतीत पाच विकेटने हार स्वीकरण्याची वेळ आली होती.

आता कर्णधार हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार अशी नवी जोडी भारतीय महिला संघाचे भवितव्य घडवण्यास सज्ज झाली आहे. २०२५ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी ही सुरुवात असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मालिकेतून नव्या खेळाडूंना संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. श्रेयांका पाटील, साईक इशाक, मन्नत कश्यप आणि टिटास साधू यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे. अनुभवी देविका वैद्यला मात्र वगळण्यात आले आहे.

संघ यातून निवडणार ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, रिचा घोष, अमनज्योत कौर, श्रेयांका पाटील, मन्नत कश्यप, साईका इशाक, रेणुका सिंग ठाकर, टिटास साधू, पूजा वस्त्रकार, स्नेह राणास हर्लिन देओल.

ऑस्ट्रेलिया ः ड्रेसी ब्राऊनस हेराथ ग्रेहॅम, अॅश्लेघ गार्डनर, किम ग्रेथ, अलिया हिली (कर्णधार), जेस जोनासेन, अॅलना किंग, फोईबे लिचफिल्ड, ताहिला मॅकग्रा, बेथ मूनी, इलिस पेरी, मेगन शूट, अनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

'केस नं ७३' मध्ये अमित शिंदे साकारणार 'ही' भूमिका; उलगडणार गूढ रहस्य

Makar Sankranti Sale : घाई करा! मकर संक्रांतीनिमित्त 'स्मार्ट बाजार'ला मोठी ऑफर; 'या' वस्तू झाल्या एकदम स्वस्त

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: मेष, कर्क अन् मकरसह 'या' राशीच्या लोकांना मिळेल त्रिग्रह योगाचा फायदा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT