India vs Bangladesh 1st Test Day 4 Stumps Axar Patel BAN vs IND match set for Day 5 thriller cricket news kgm00 
क्रीडा

IND vs BAN : रूको जरा सबर करो! अक्षरने बांगलादेशची झुंज काढली मोडून, भारत विजयाच्या जवळ

Kiran Mahanavar

India vs Bangladesh 1st Test Day 4 Stumps : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवशी बांगलादेशी फलंदाजांनी झुंजार खेळ करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले. चौथ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी बांगलादेशने 6 बाद 272 धावा केल्या होत्या.

आता उद्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट्सची तर बांगलादेशला 241धावांची गरज आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला चार विकेट्स घ्याव्या लागणार आहेत. सध्या बांगलादेशचा कर्णधार 40 धावा तर मेहदी हसन मिराज 9 धावा करून नाबाद आहे. भारताकडून आज चौथ्या दिवशी अक्षर पटेलने 3 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी सलामीवीर झाकीर हसनने पदार्पणात शतकी खेळी केली. तर त्याला नजमुल हुसैन शंतोने 63 धावा करून चांगली साथ दिली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 404 धावा केल्या. पुजारा 90, श्रेयस अय्यर 86 आणि रविचंद्रन अश्विन 58 धावांवर बाद झाला. पंत आणि कुलदीपनेही चांगले योगदान दिले. बांगलादेशकडून तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 150 धावा करू शकला. भारताकडून कुलदीप यादवने पाच आणि मोहम्मद सिराजने तीन बळी घेतल्या.

शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 258 धावा केल्या. पुजाराच्या शतकासह कर्णधार राहुलने डाव घोषित केला. भारताने आपला दुसरा डाव 512 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT