India vs Bangladesh 1st ODI 2022 SAKAL
क्रीडा

IND vs BAN: भारताच्या 3 सर्वात मोठ्या चुका! ज्यामुळे जिंकलेला सामना गमावला

Kiran Mahanavar

India vs Bangladesh 1st ODI 2022 : बांगलादेशने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेश 1 विकेटने रोमांचक असा हा सामना जिंकला. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांच्या सोबत भारतीय संघाला मोहिमेची विजयी सुरुवात करता आली नाही.

खरं तर टी-20 वर्ल्ड कपनंतर तिन्ही स्टार्सना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. या तिघांनीही बांगलादेश दौऱ्यावर पुनरागमन केले आहे. मात्र राहुलशिवाय एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाही आणि पहिल्याच सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. एकेकाळी भारताने सामन्यात पुनरागमन केले असले तरी 3 चुकांमुळे तो सामना गमावला.

  • भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारताची खराब फलंदाजी, ज्यामुळे भारत यजमानांसमोर मोठे लक्ष्य ठेवता आले नाही. राहुलशिवाय एकाही फलंदाजाला आजच्या सामन्यात चालला नाही. शिखर धवन 7, रोहित शर्मा 27 आणि कोहली केवळ 9 धावा करू शकले. खराब फलंदाजीमुळे भारताला पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत.

  • भारताच्या पराभवाचे कारण भारताच्या तोंडावरचा विजय हिसकावून घेणारा मेहदी हसन मिराज आहे. मिराज 38 धावांवर नाबाद राहिला. भारताला एकवेळ जिंकण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती, पण मिराजने शेवटपर्यंत उभे राहून बांगलादेशला विजय मिळवून दिला. भारतीय गोलंदाजांना मिराज आणि रहमानची जोडी फोडता आली नाही. दोघांमध्ये 51 धावांची अखंड भागीदारी झाली.

  • 42 षटकांनंतर बांगलादेशला विजयासाठी 48 चेंडूत 32 धावांची गरज होती. भारताचा विजय दिसत होता, पण चहरच्या 44व्या षटकाने भारताच्या हातातून सामना काढून घेतला. चहरने त्याच्या षटकात 15 धावा दिल्या. या षटकानंतर बांगलादेशला 36 चेंडूत अवघ्या 14 धावांची गरज होती, जी त्यांनी सहज पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT