क्रीडा

छेत्रीची कमाल! मेस्सीला टाकलं मागे; आता फक्त रोनाल्डो पुढे

सूरज यादव

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात छेत्रीने दोन गोल करताना अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकलं आहे.

दोहा- भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर भारताने बांगलादेशविरोधात 2-0 ने विजय मिळवला. फुटबॉल वर्ल्ड कप आणि आशियाई चषक क्वालिफायर्सच्या ई ग्रुपच्या दुसऱ्या फेरीत बांगलादेशला पराभूत करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. भारत 2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतून आधीच बाहेर पडला असला तरी कर्णधार सुनिल छेत्रीने मात्र कमाल केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात छेत्रीने दोन गोल करताना अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकलं आहे.

छेत्रीने 79 व्या मिनिटाला गोल करून संघाचं खातं उघडलं. त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात आणखी एक गोल करून ग्रुप ई मधील या सामन्यात विजय निश्चित केला. या गोलसह सुनिल छेत्रीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये स्वत:च्या नावावर 74 गोल नोंदवले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोचे सर्वाधिक 103 गोल आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी आता सुनिल छेत्री आहे.

फुटबॉलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 11 व्या स्थानी आहे. त्याच्या पुढे 10 नंबरवर तीन खेळाडू आहेत. हंगेरीच्या सेंडर कोक्सिस, जपानचा कुनिशिगे कामटो आणि कुवैतच्या बशर अब्दुल्ला यांचे प्रत्येकी 75 गोल झाले आहेत. सुनिल छेत्रीनंतर युएईच्या अलीचा (73 गोल) नंबर लागतो तर मेस्सीचे 72 गोल झाले आहेत.

भारताने याआधी तीन जूनला आशियाई चॅम्पियन कतारविरोधात सामना खेळला होता. त्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कमबॅक केलं. भारताचाा पुढचा सामना आता अफगाणिस्तानशी असणार आहे. बांगलादेशनं शेवटच्या मिनिटापर्यंत सामना बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT