India Vs Bangladesh,SAFF U19 Women’s Championship:  Sakal
क्रीडा

भारताच्या विजयानंतर बांग्लादेशी फॅन्सचा मैदानावरच राडा! महिला संघावर दगडफेकीनंतर बदलला निकाल

India Vs Bangladesh, SAFF U19 Women’s Championship : भारताला गुरूवारी बांग्लादेश येथे झालेल्या SAFF महिला अंडर-१९ फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं आहे

रोहित कणसे

India Vs Bangladesh, AFF U19 Women’s Championship : भारताला गुरूवारी बांग्लादेश येथे झालेल्या SAFF महिला अंडर-१९ फुटबॉल चॅम्पियनशिप (SAFF Women's Under-19 Football Championships) मध्ये संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं आहे. निर्धारित वेळेत सामना एकएकच्या बरोबरीत संपला. त्यानंतर पेनल्टी शूटआउट देखील बरोबरीत संपलं. मात्र यादरम्यान वेगळाच राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मॅचचा निकाल आपल्या बाजून न लागल्याने बांग्लादेशचे फॅन चांगलेच भडकले आणि त्यानंतर मैदानावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यावेळी फॅन्सनी महिली संघावर दगड आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार समोर आला.

नेमकं झालं काय?

ही फुटबॉल मॅच बरोबरीत सुटल्यानंतर अधिकाऱ्यांनी नाणेफेक करत भारतीय संघाला स्पर्धेचे विजेते घोषित केलं. यांनंतर बांग्लादेशी फॅन्सनी मैदानावर दगड आणि बाटल्या फेकायला सुरूवात केली. यामुळे सामन्याचा निकाल बदलावा लागला आणि दोन्ही संघाना संयुक्त विजेते घोषित करण्यात आलं.

निर्धारित ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांमधील खेळ १-१ असा बरोबरीत सुटला. यानंतर पेनल्टी शूटआऊट झालं, तेही बरोबरीत राहिलं आणि गोलरक्षकांसह दोन्ही संघांच्या सर्व ११ खेळाडूंनी पेनल्टी किकमध्ये गोल नोंदवले.

Ranji Trophy : मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्‍चित ; रहाणे, शार्दुल, तुषार देशपांडेच्या पुनरागमनामुळे ताकद वाढली

स्कोअरलाइन ११-११ पर्यंत पोहोचल्यानंतर, रेफ्री पेनल्टी शूटआउट सुरू ठेवणार होते, परंतु नंतर तसे न करण्यास सांगित आले. यानंतर दोन्ही बाजूंच्या कर्णधारांना बोलावून नाणेफेक केली. नाणेफेक जिंकण्यात भारताला यश आले आणि त्यांनी जल्लोष सुरू केला.

बांगलादेशींनी याचा जोरदार विरोध केला आणि खेळाडूंनी देखील मैदान सोडण्यास नकार दिला. यानंतर गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. यानंतर मोठ्या संख्येने मैदानावर दगड आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यात आल्या. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.

मॅच कमिश्नर ज्यांनी नाणेफेकीचा निर्णय घेतला होता, त्यांनी एक तासाहून अधिका काळानंतर आपला निर्णय बदलून भारत आणि बांग्लादेश यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आला. आयइएएएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा अखिर भारतीय फुटबॉल महासंघाकडून ही चांगली बाब असून आम्ही दोन्ही पक्षांकडून संयुक्त विजेता घोषित करण्याचा निर्णय स्वीकारला असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियामांवरून मॅच अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता त्यामुळे ही स्थिती घडल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT