Team India Playing 11 esakal
क्रीडा

IND vs BAN Playing 11 : नो रोटेशन! बॉलिंग कोचने थेटच सांगितलं, दोन अनुभवी खेळाडू बेंचवरच बसणार?

अनिरुद्ध संकपाळ

Team India Playing 11 : वर्ल्डकप 2023 च्या 18 व्या सामन्यात उद्या (दि. 19) भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होत आहे. पुण्यात होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे एक गूढच असणार आहे. इतिहास पाहता येथील खेळपट्टी फिरकीला साथ देणारी संथ खेळपट्टी असते. मात्र नव्या खेळपट्टीबाबत अशी खात्री देता येत नाही. नवी खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सामन्यापूर्वी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी संघ गोलंदाजांच्या बाबतीत कोणताही रोटेशन पद्धती अवलंबणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे खेळपट्टीची जशी डिमांड असेल तसा संघात बदल केला जाईल. जर पुण्यातील खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असेल तर रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी या दोन अनुभवी गोलंदाजांना बेंचवरच बसावे लागण्याची शक्यता आहे.

पारस म्हाम्ब्रे प्री मॅच प्रेस कॉन्फरन्सिमध्ये म्हणाले की, 'भारताने वर्ल्डकपची केलेली दमदार सुरूवात ही कायम राखणं महत्वाचं आहे. त्यामुळे सध्या तरी रोटेशन बाबत सध्या तरी कोणतीही चर्चा नाही. माझ्या मते सध्याचा विजयी रथ पुढे नेणे गरजेचे आहे. त्यामुळे रोटेशनचा कोणताही विचार नाही.'

पुण्यातील गेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास 400 धावा झाल्या होत्या. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 सामन्यात धावांचा पाऊस पडला होता. त्यामुळे ही खेळपट्टी चेन्नईसारखी संथ असणार नाही. ही फलंदाजीला थोडी साथ देईल.

शमी विरूद्ध अश्विन?

शार्दुल ठाकूर भारताची बॅटिंग डेप्थ अजून वाढवत आहे. मात्र त्याची ना गोलंदाजीत ना फलंदाजीत दमदार झाली आहे. गेल्या 30 वनडे सामन्यात शार्दुल ठाकूरने फक्त 3 वेळाच त्याचा 10 षटकांचा कोटा पूर्ण केला आहे. धावा देण्याच्या बाबतातही त्याचा हात सढळच असतो. त्याने 30 वनडे सामन्यात एकदाच अर्धशतकी खेळी केली आहे. हार्दिक पांड्या आता पूर्ण भरात आला असून शार्दुलची आता संघात गरज आहे असं वाटत नाही.

असं असलं तरी शार्दुल ठाकूरला संघ व्यवस्थापनाने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र आता बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ मोहम्मद शमी किंवा रविचंद्रन अश्विन यांना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यातील खेळपट्टी ही काळ्या मातीत तयार केलेली असते. त्यामुळे जर संघात बदल करायचा झाला तर अश्विनचे पारडे शमीपेक्षा जास्त जड आहे. मात्र जर खेळपट्टीत वेगवान गोलंदाजांसाठी थोडी जरी मदत असेल तर शार्दुलच्या ऐवजी शमी संघात येऊ शकतो.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

  • रोहित शर्मा

  • शुभमन गिल

  • विराट कोहली

  • श्रेयस अय्यर

  • केएल राहुल

  • हार्दिक पांड्या

  • रविंद्र जडेजा

  • शार्दुल ठाकूर /आर. अश्विन /मोहम्मद शमी

  • कुलदीप यादव

  • जसप्रीत बुमराह

  • मोहम्मद सिराज

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

सलग ५ निर्धाव षटकं अन् ५ विकेट्स; Justin Greaves इतिहास घडवला, पाकिस्तानने गुडघे टेकले; ७ फलंदाज ३८ धावांत तंबूत Video

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना

Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT