क्रीडा

IND vs ENG 1st Test Day 3 : पोपचा शतकी तडाखा; तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे भक्कम आघाडी

अनिरुद्ध संकपाळ

इंग्लंडकडे भक्कम आघाडी 

India Vs England : इंग्लंडने पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजीचं प्रदर्शन करत भारतीय फिरकीपटूंना चांगलेच दमवले. ऑली पोपने शतकी खेळी ( नाबाद 148 धावा) करत इंग्लंडला दुसऱ्या डावात 6 बाद 316 धांपर्यंत पोहचवले. इंग्लंडकडे तिसऱ्या दिवसअखेर 126 धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 436 धावा केल्या होत्या.

अक्षर पटेलने अखेर जोडी फोडली 

अक्षर पटेलने ऑली पोप आणि बेन फोक्सची जोडी फोडली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. फोक्स 34 धावा करून बाद झाला.

Ollie Pope : ऑली पोपचे झुंजार शतक 

इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ऑली पोपने दुसऱ्या डावात झुंजार शतक ठोकले. या शतकाच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 245 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडे आता 55 धावांची भागीदारी आहे.

अश्विनने केली स्टोक्सची शिकार 

पहिल्या डावात 70 धावांची झुंजार खेळी करणारा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुसऱ्या डावात मात्र 6 धावा करून माघारी फिरला. अश्विनने त्याचा त्रिफळा उडवला.

ऑली पोपचे अर्धशतक

इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपने झुंजार अर्धशतक ठोकले. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 29 षटकात 4 बाद 149 धावांपर्यंत मजल मारली आहे.

जडेजाने दिला चौथा धक्का 

रविंद्र जडेजाने इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्याने जॉनी बेअरस्टोला 10 धावांवर असताना बाद केलं. यामुळे इंग्लंडची अवस्था 4 बाद 140 धावा अशी झाली आहे. भारत अजूनही 50 धावांनी आघाडीवर आहे.

IND vs ENG 1st Test Day 3 Live : बुमराहने आक्रमक डकेटसोबत रूटचीही केली शिकार

जसप्रीत बुरमाहने बेन डकेटला 47 धावांवर बाद केल्यानंतर जो रूटला देखील माघारी धाडलं त्याने रूटला 2 धावांवर पायचीत केलं. यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 117 धावा अशी झाली आहे.

IND vs ENG 1st Test Day 3 Live : अखेर भारताचा उपकर्णधार आला धावून

इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने आक्रमक फलंदाजी करत 52 चेंडूत 47 धावा केल्या. त्याने ओली पोपसोबत इंग्लंडला 113 धावांपर्यंत पोहचवले होते. अखेर भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवत भारताला दिलासा दिला.

India vs England : उपहारापर्यंत इंग्लंडची दमदार फलंदाजी 

इंग्लंडने पहिल्या सत्रात 1 बाद 89 धावा केल्या. क्राऊली 31 धावा करून बाद झाल्यानंतर बेन डकेटने 38 धावा करत इंग्लंडला 89 धावापर्यंत पोहचवले. भारताकडे अजून 101 धावांची आघाडी आहे. डकेटने रिव्हर्स स्विपचा खुबीने वापर केला.

IND vs ENG 1st Test Day 3 Live : आक्रमक झॅक क्राऊलीची अश्विनने केली शिकार

भारताने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव आक्रमकपणे सुरू केला. झॅक क्राऊलीने 33 चेंडूत 31 धावा ठोकल्या होत्या. मात्र अश्विनने त्याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

IND vs ENG : भारताचा डाव संपुष्टात 

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा 44 धावांवर त्रिफळा उडवला. भारताचा पहिला डाव 436 धावांवर संपुष्टात आला. भारताकडे पहिल्या डावात 190 धावांची आघाडी आहे.

Joe Root : जो रूट हॅट्ट्रिकची संधी  

जो रूटने जडेजापाठोपाठ जसप्रीत बुमराहला पुढच्याच चेंडूवर बोल्ड केलं. हॅट्ट्रिक करण्याची संधी रूटला होती मात्र हा प्रयत्न मोहम्मद सिराजने हाणून पाडला.

Ravindra Jadeja : रविंद्र जडेजाचे शतक हुकले

जो रूटने रविंद्र जडेजाला 87 धावांवर बाद केले. भारताचा या डावातील तिसरा फलंदाज 80 च्या घरात बाद झाला आहे. यशस्वी, केएल पाठोपाठ आता जडेजा देखील शतक पूर्ण न करता माघारी फिरला.

रविंद्र जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर 

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आपले चौथे कसोटी शतक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूने त्याला अक्षर पटेल चांगली साथ देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT