India vs England 3rd T20I  
क्रीडा

IND vs ENG : बटलरपुढे टीम इंडियाचा 'जोश' कमी पडला; इंग्लंडची मालिकेत पुन्हा आघाडी

सकाळ ऑनलाईन टीम

India vs England 3rd T20I : कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवर बटलरची अर्धशतकी खेळी तगडी ठरली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर 156 धावा करत पाहुण्या इंग्लंड संघासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने 8 गडी 10 चेंडू राखून सहज पार केले. य विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. बटलरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवत भारतीय गोलंदाजांचे खांदे पा़डले. त्याने  52 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी केली. त्याला जॉनी बेयरस्ट्रोने सुरेख साथ दिली. तो 28 चेंडूत 40 धावा करुन नाबाद राहिला.  

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मार्क वूडने भारतीय आघाडीला सुरुंग लावत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. सुरुवातीच्या पडझडीनंतर मध्यफळीत आलेल्या पंतने कर्णधाराला साथ दिली. मात्र ही जोडी दुर्देवीरित्या फुटली. इंग्लंडचे गोलंदाज जोडी फोडण्यात अपयशी ठरल्यानंतर रन आउटच्या रुपात टीम इंडियाने चौथी विकेट गमावली. विराट कोहलीने शेवटपर्यंत नाबाद राहत हार्दिक पांड्याच्या साथीने 33 चेंडूत 70 धावा कुटल्या. त्यामुळे भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 157 धावांपर्यंत मजल मारता आली.  

या धावांचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जोस बटलर यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. सलामीवीर जेसन रॉय चहलच्या चेंडूवर उलटा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर डेविड मलान आणि बटलर या जोड़ीने 59 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. वॉशिंग्टनने मलानला बाद करत भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. मात्र ठराविक अंतराने भागीदारी फोडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. दुसरी विकेट पडल्यानंतर मैदानात उतरलेल्या जॉनी बेयरस्ट्रोने बटलरला उत्तम साथ दिली. त्याने सलग दोन चौकार खेचून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

Gemini AI Photo Trend: जगातील नेत्यांसोबत हायपर-रिअ‍ॅलिस्टिक फोटो तयार करा! जाणून घ्या सोप्या स्टेप्स...

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजना बंद होणार नाही: मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 5 चुका टाळा, नाहीतर रिटर्न्स मिळण्याऐवजी नुकसान होऊ शकतं

SCROLL FOR NEXT