India vs England 3rd Test Day  
क्रीडा

INDvsENG 3rd Test Day 2 Live : टीम इंडियासमोर अवघ्या 49 धावांचे आव्हान

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन सुंदरने जेम्स अँड्रसनची विकेट घेत इंग्लंडचा दुसरा डाव 81 धावांत गुंडाळला. इंग्लंडने दुसऱ्या डावात 48 धावांची आघाडी घेतली असून भारतासमोर आता केवळ 49 धावांचे आव्हान आहे. अक्षर पटेलने पाच तर अश्विनने 4 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवशीच्या खेळात एकूण 17 विकेट पडल्या. भारतीय संघाने 3 बाद 99 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. भारतीय संघाचा पहिला डाव 145 धाावंत आटोपला. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पण फिरकीपटूंसमोर त्यांचा निभावच लागला नाही. अक्षर पटेलने आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला. 

ज्यो रुट आणि जॅक लीच यांच्या फिरकीसमोर भारतीय संघाचा पहिला डावा 145 धावांत आटोपला होता. इंग्लिश कर्णधार ज्यो रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावा केल्या होत्या. लीचने त्याला बाद केले. भारतीय संघाने पहिल्या डावात 33 धावांची आघाडी घेतली असून दुसऱ्या दिवशीच इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. 

3 बाद 99 धावांवरुन टीम इंडियाने खेळाला सुरुवात केली. धावफलकावर 114 धावा असताना अजिंक्य रहाणे बाद झाला. जॅक लीचने त्याला माघारी धाडले. धावसंख्येत अवघी एक धाव झाली असताना रोहितनेही मैदान सोडले. त्याचीही विकेट लीचनेच घेतली. पंत (1), अश्विन (17), वॉशिंग्टन सुंदर (0), अक्षर पटेल (०), बुमराह यांना बाद करत रुटने अर्धा संघ माघारी धाडण्याचा पराक्रम केला. भारती संघाचा डाव आटोपल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावाची सुरुवात केली. जॅक क्रॉऊली (0)आणि जॉनी ब्रेयरस्टोला अक्षर पटेलने पहिल्याच षटकात बाद केले आहे.

लाईव्ह अपडेट्स

81-10 : वॉशिंग्टन सुंदरला पहिलं यश, इंग्लंडचा दुसरा डावा 81 धावांत आटोपला
80-9 : अश्विनला आणखी एक यश; जॅक लीच 9 धावांवर बाद
80-8  : अक्षर पटेलनं फोक्सला 8 धावांवर धाडले तंबूत

अश्विनने गाठला 400 विकेटचा टप्पा, मुथय्या मुरलीधरन यांच्यानंतर सर्वात जलद कसोटी टप्पा पार करणारा गोलंदाज

68-7 : जोफ्राला अश्विनने खातेही उघडू दिले नाही,

66-6 :  पोप्स 12 धावा करुन माघारी, अश्विनला मिळाले यश

56-5 : ज्यो रुटचा संयम ढळला, अक्षर पटेलने 19 धावांवर केले बाद

50-4 : अश्विनने बेन स्टोक्सच्या खेळीला लावला ब्रेक, 25 धावा करुन त्याने सोडले मैदान

19-3 : सिब्लेच्या रुपात अक्षर पटेलला मिळाली तिसरी विकेट, त्यान सात धावांची भर घातली 

0-2 : जॉनी बेयरस्टोही खाते न उघडता परतला, अक्षर पटेलला मिळाली विकेट

0-1 : पहिल्या डावातील अर्धशतकवीर शून्यावर माघारी, अक्षर पटेलनं घेतली क्रॉउलेची विकेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT