IND vs ENG Day 3 LIVE Cheteshwar Pujara
IND vs ENG Day 3 LIVE Cheteshwar Pujara esakal
क्रीडा

IND vs ENG Day 3 : पुजाराचे संयमी अर्धशतक; पंतचा आक्रमक अवतार

Kiran Mahanavar

बर्मिंगहम : भारताने आपल्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 125 धावा केल्या. चतेश्वर पुजाराने संयमी अर्धशतकी खेळी करून अँकर इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला तर त्याला साथ देण्यासाठी आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक खेळ करत संघाचे शतक धावफलकावर लावले. मात्र विराट कोहली(20), हनुमा विहारी (11) आणि शुभमन गिल (4) यांनी निराशा केली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ सुरू आहे. मोहम्मद सिराजच्या चार आणि कर्णधार जसप्रीत बुमराहच्या तीन विकेट्समुळे भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 284 धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 106 धावा केल्या.

IND vs ENG 5th Test Day 3 HIGHLIGHTS

125/3 (45) : दिवस अखेर भारताकडे 257 धावांची आघाडी

पुजाराच्या अर्धशतकाबरोबरच सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारताने दिवसअखेर 3 बाद 125 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 50 तर ऋषभ पंत 30 धावा करून नाबाद होते. भारताकडे आता 257 धावांची आघाडी आहे.

पुजाराचे दमदार अर्धशतक

भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने दमदार फलंदाजी करत नाबाद अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडवरील आघाडी 250 च्या पार पोहचवली.

100/3 (35.5) : भारताची शंभरी पार 

विराट कोहली माघारी गेल्यानंतर चेतेश्वर पुजाराने ऋषभ पंतच्या साथीने भारताला शंभरी पार करून दिली. याचबरोबर भारताची आघाडी 232 धावांपर्यंत पोहचली.

75-3 : भारताला तिसरा धक्का

भारताने आपली आघाडी 200 पार पोहचवल्यानंतर विराट कोहली 20 धावा करून बाद झाला.

  • भारताची इंग्लंडवर आता 200 धावांची आघाडी

    दुसऱ्या डावात टीम इंडियाने आतापर्यंत 2 गडी गमावून 68 धावा केल्या. यासह टीम इंडिया यजमानांवर आता 200 धावांची आघाडी घेतले आहे. विराट कोहलीसोबत चेतेश्वर पुजारा क्रीजवर आहे.

  • कोहलीची जुनी झलक

    हनुमा विहारी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला विराट कोहली त्याच्या शैलीत फलंदाजी करताना दिसत आहे. कोहलीने 8 चेंडूत 13 धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश आहे. यात त्याने कव्हर्सच्या दिशेने दोन चौकार मारले.

  • टी ब्रेक नंतर; भारताला दुसरा धक्का

    स्टुअर्ट ब्रॉडने टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. हनुमा विहारी 44 चेंडूत 11 धावा करून बाद झाला.

  • सुरुवातीच्या धक्क्यानंतर पुजारा-विहारी भारताला सावरले - टी ब्रेकपर्यंत भारत 37/1

    पुजारा आणि विहारीच्या बळावर भारताने चहापर्यंत 1 गडी गमावून 37 धावा केल्या आहे. विहारी 37 चेंडूत 10 धावा तर पुजारा 39 चेंडूत 17 धावा खेळत आहे.

  • भारताची 32/1

    शुभमन गिल पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी भारतीय डाव सांभाळण्यास सुरुवात केली आहे. सध्या पुजारा 15 तर विहारीने 6 धावांवर खेळत आहे. भारताची आघाडी आता 164 झाली आहे.

  • भारताला दुसऱ्या डावात पहिला धक्का

    दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब झाली. जेम्स अँडरसनने पहिल्याच षटकात शुभमन गिलला पॅव्हेलियनमध्ये.

  • इंग्लंड 284 ऑलआउट, भारताला 132 धावांची आघाडी

    इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर आटोपला. पॉट्सला बाद करून सिराजने इंग्लंडचा डाव संपवला. भारताकडून मोहम्मद सिराजने 4 बळी घेतले.

  • सिराजने घेतली तिसरी विकेट

    मोहम्मद सिराजने सामन्यातील तिसरी विकेट घेतली आहे. सॅम बिलिंग्जला बाद करून त्याने इंग्लंडला नववा धक्का दिला.

  • इंग्लंडला धक्क्यावर धक्के; बेअरस्टोनंतर ब्रॉडही झाला बाद

    सिराजने सामन्यात दुसरी विकेट घेतली. मोहम्मद सिराजने स्टुअर्ट ब्रॉडला पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडला आठवा धक्का दिला आहे. ब्रॉडला केवळ 1 धाव करता आली.

  • शमीने शतकवीर बेअरस्टोला केले आऊट; इंग्लंडची सातवी विकेट पडली

    भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टोला बाद केले आहे. शमीच्या ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात जॉनी बेअरस्टोने विराट कोहलीला स्लिपमध्ये झेलबाद झाला. जॉनीने 140 चेंडूत 106 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले.

  • 50 षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या 235/6

    इंग्लंडने 50 षटकात 6 विकेट गमावत 235 धावा केल्या आहेत. सध्या जॉनी बेअरस्टो 102 आणि सॅम बिलिंग्ज 23 धावा करून क्रीजवर आहेत. यजमान संघ सध्या पहिल्या डावाच्या आधारे भारतापेक्षा 181 धावांनी मागे आहे.

  • बेअरस्टोच्या झंझावाती शतकामुळे इंग्लंडने फॉलोऑन वाचवला

    इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. त्याने 119 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

  • बर्मिंगहॅममध्ये पाऊस थांबला, काही वेळात सुरू होईल सामना

    पाऊस थांबल्यानंतर खेळ सुरू झाला आहे. शार्दुल ठाकूर त्याचे अपूर्ण ओव्हर पूर्ण केले आहे. जॉनी बेअरस्टो आणि सॅम बिलिंग्स खेळत आहे.

  • पावसामुळे खेळ थांबला

    पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे सध्या खेळ थांबला आहे. सध्या इंग्लंडने पहिल्या डावात 45.3 षटकात 6 विकेट गमावून 200 धावा केल्या आहेत. सध्या यजमान पहिल्या डावाच्या आधारे भारतापेक्षा 216 धावांनी मागे आहे, तर त्यांच्या 4 विकेट्स शिल्लक आहेत. खेळ थांबला तेव्हा जॉनी बेअरस्टो ९१ आणि सॅम बिलिंग्ज ७ धावा खेळत आहे.

  • जॉनी बेअरस्टो शतकाच्या जवळ

    शार्दुल ठाकूरच्या डावातील 44व्या षटकात जॉनी बेअरस्टोने 1 चौकार आणि 1 षटकार मारला. या षटकात एकूण 11 धावा केल्या. बेअरस्टो सध्या 88 तर सॅम बिलिंग्सने 6 धावा करून क्रीजवर आहे. इंग्लंडने 44 षटकांत 6 गडी गमावून 196 धावा केल्या आहे.

  • लॉर्ड शार्दुलने स्टोक्स केले बाद

    बेन स्टोक्स 25 धावा करून बाद झाला. स्टोक्सने कर्णधार जसप्रीत बुमराहच्या हाती झेल दिला. इंग्लंडची धावसंख्या आता 6 विकेटवर 149 धावा आहे.

  • जॉनी बेअरस्टोने ठोकले अर्धशतक

    जॉनी बेअरस्टोने 81 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने मोहम्मद सिराजच्या 37व्या षटकातील 5व्या चेंडूवर एकच धाव घेत 50 धावा पूर्ण केल्या. इंग्लंडने 37 षटकात 5 विकेट गमावत 148 धावा केल्या आहेत.

  • तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू, बेअरस्टो-स्टोक्स क्रीजवर

    इंग्लंडच्या 100 धावा 32 व्या षटकात पूर्ण झाल्या.

  • हवामान स्वच्छ

    तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश चांगला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना आज पूर्ण खेळ पाहायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT