IND Vs ENG Weather Report 
क्रीडा

IND Vs ENG Weather Report: भारत-इंग्लंड सामन्याची मजा पाऊस करणार खराब? जाणून घ्या कसे असेल लखनऊमध्ये हवामान

Kiran Mahanavar

India vs England Weather Report : वर्ल्ड कप 2023 चा 29 वा सामना आज 29 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

लखनऊच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाने या स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. लखनऊचे हवामान कसे असेल ते सामन्यापूर्वी जाणून घेऊया....

लखनऊमध्ये रविवारी सर्वाधिक तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. इथे पावसाची शक्यता खूपच कमी आहे. Accuweather च्या रिपोर्टनुसार, लखनऊमध्ये पावसाची शक्यता नाही. म्हणजेच चाहत्यांना संपूर्ण 100 षटकांच्या सामन्याचा आनंद घेता येईल.

संध्याकाळी मैदानात थोडे दव पडू शकते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. आतापर्यंत येथे तीन वर्ल्ड कपचे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 2 विजय मिळवले आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.

इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT