Ind vs Eng Playing 11 
क्रीडा

Ind vs Eng Playing 11 : लखनौचे ‘नवाब’ होण्याची संधी! खेळपट्टी पाहता रोहित कोणत्या प्लेइंग-11 सोबत खेळणार?

सुनंदन लेले

India vs England Playing 11 : भारतीय संघ सलग पाच सामन्यांतील विजयासह भरारी मारत असताना इंग्लंडचा संघ सलगच्या पराभवांनी चांगलाच गटांगळ्या खात आहे. तरीही भारतीय संघाला इंग्लंडला संघासमोर एकाग्रतेचे व्रत कायम ठेवावे लागणार आहे. इंग्लंड संघाचा चालू विश्वचषक स्पर्धेत अत्यंत सुमार खेळ झालेला असला तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही. म्हणूनच लखनौला नवाबी खेळ करायचा पक्का विचार करूनच भारतीय संघ आज मैदानात उतरेल.

क्रिकेटच्या खेळात काहीही होऊ शकते असे जे म्हटले जाते त्याचे इंग्लंड संघ मूर्तिमंत उदाहरण बनला आहे. स्पर्धेअगोदर सगळे जाणकार इंग्लंड संघ मजबूत असल्याचे विश्वासाने सांगत होते. स्पर्धा चालू झाली आणि पहिल्याच सामन्यात इंग्लंडने उभारलेल्या मोठ्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. त्यानंतर इंग्लंड संघाला अजून तीन पराभवांचे धक्के लागले. परिणामी गतविजेत्या इंग्लंड संघाला गुणतालिकेत रसातळाला जावे लागले आहे.

अगदी बरोबर उलट कहाणी भारतीय संघाची झाली आहे. पाच सामन्यांत पाच वेगळ्या शहरांतील वेगळ्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघाने जुळवून घेत सरस कामगिरी करून पाच विजय मिळवले. लक्षणीय बाब अशी, की भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी हातात हात घालून चांगली कामगिरी करत आहे.

उपकप्तान हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात गेल्या सामन्यात बदल केले गेले. तसेच बदल रोहित शर्मा लखनौची खेळपट्टी तपासून करेल असे वाटते. गवत काढलेली गरम हवेतील खेळपट्टी काहीशी संथ असायची शक्यता बोलून दाखवली जात आहे. म्हणजेच अश्विनला संघात जागा मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही. गेल्या सामन्यात शमीने केलेल्या भेदक माऱ्‍यामुळे जर एका वेगवान गोलंदाजाला इंग्लंडसमोरच्या सामन्यात बाहेर बसावे लागले तर कुऱ्‍हाड सिराजच्या जागेवर पडेल.

नाणेफेक महत्त्वाची?

चांगली खेळपट्टी आणि गरम कोरडी हवा यामुळे नाणेफेकीच्या निकालाचा सामन्यावर खूप मोठा परिणाम होणार नाही, असे समजते आहे. तरीही नाणेफेक जिंकली तर भारतीय संघ कधी ना कधी पहिली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारून त्याची राखण करायचा पर्याय निवडेल, असे वाटते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

Nanded Crime : 21 वर्षीय तरुणीवर घरात घुसून अत्याचार; तोंडात विषारी द्रव पाजून तिला ठार मारण्याचाही केला प्रयत्न

Latest Marathi News Live Update : फलटनमध्ये पोलिस ठाण्यासमोर सुष्मा अंधारेचा ठिय्या

SCROLL FOR NEXT