Ind vs Eng 1st Test  sakal
क्रीडा

Ind vs Eng 1st Test : इंग्लंडच्या शेपटाचा बॅझबॉल! कर्णधारासोबत 100 धावा जोडत वाचवली इंग्लंडची लाज

Kiran Mahanavar

India vs England Score 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 246 धावांत गारद झाला.

इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. जॉनी बेअरस्टोने 37 धावा केल्या. तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी आतापर्यंत सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या आहेत. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांना 2-2 यश मिळाले.

तत्पूर्वी उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या 3 बाद 108 धावा होती. उपाहारापर्यंत भारतीय फिरकीपटूंनी खेळपट्टीने दिलेल्या मदतीचा फायदा घेत इंग्लंडची 'बॅसबॉल' रणनीती उधळून लावली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

इंग्लंड संघाला 155 धावांवर सातवा धक्का बसला होता. त्यानंतर भारताला फक्त 3 विकेटची गरज होती, पण इंग्लंडच्या शेवटच्या फलंदाजांनी कर्णधारासोबत बॅझबॉल क्रिकेट खेळली आणि जवळपास 100 धावा जोडल्या आणि इंग्लंडची लाज वाचवली.

कर्णधार बेन स्टोक्स एकट्या गोलंदाजांचा सामना करताना दिसला आणि त्याने अर्धशतक झळकावले. आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावांत गुंडाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT