Rohit Sharma  ESAKAL
क्रीडा

Ind Vs Eng: रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग, BCCI ने केला खुलासा...

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत सलामीची भूमिका कोण बजावणार?

Kiran Mahanavar

India Vs England Test Match: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका दरम्यान केएल राहुलला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला होता. त्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती की इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत सलामीची भूमिका कोण बजावणार? या ऐतिहासिक कसोटी सामन्यात रोहितचा जोडीदार कोण असेल. त्यावर बीसीसीआयने एका पोस्टद्वारे ही स्पष्ट केली आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर भारतीय क्रिकेट संघाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नेट सत्राच्या पहिल्या दिवशी फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत गिल आणि रोहित शर्मा भारतासाठी सलामीवीराची भूमिका बजावणार असल्याचे बीसीसीआयकडून एकीकडे उघड केले आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा आजून तरी करण्यात आली नाही. पण ज्या पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे. त्यावरून गिल रोहितसोबत कसोटी सामन्यात सलामी करणार असल्याचे तरक लावले जाता आहे.

बर्मिंगहॅममध्ये 1 जुलैला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 2-1 ने पुढे आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय संघ कसोटी मालिका मध्येच सोडून भारतात परतला होता. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामन्याव्यतिरिक्त 3 टी-20 आणि 2 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT