INDvsENG  
क्रीडा

INDvsENG : टीम इंडियाचाच रुबाब! पिछाडीवरुन पाहुण्या इंग्लंडला केलं 'धोबी पछाड'

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 2-1 असे पिछाडीवर असताना उर्वरित दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने मालिका 3-2 अशा दिमाखात जिंकली. भारतीय संघाने पाचवा आणि अखेरचा सामना 36 धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. निर्णायक सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 224 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर शून्यावर माघारी फिरला. भुवीने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर डेविड मलान आणि जोस बटलर जोडीने इंग्लंडला पुन्हा सामन्यात आणले. ही सेट जोडी भुवनेश्वरने फोडली. बटलर 34 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या जॉनी बेयरस्ट्रोला शार्दुल ठाकूरने आवघ्या 7 धावांवर माघारी धाडले. याच षटकात शार्दुलने डेविड मलानला बोल्ड केले. मलालने 46 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 68 धावांची खेळी केली.  भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भुवीने महत्त्वपूर्ण दोन विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्या आणि टी नटराजनला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने रोहितसोबत टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी इंग्लिश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 94 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कोहलीने सुर्यकुमार यादवसोबत 49 धावांची भागीदारी केली. सुर्याच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. अखेरच्या षटकात कोहली आणि हार्दिक पांड्याने 81 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने 52 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 39 धावा कुटल्या. पांड्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार खेचले. अदिल रशीद आणि बेन स्टोक्स वगळता अन्य एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांच्या खेळीला ब्रेक लावता आला नाही. 

डोंगराऐवढ्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर जेसन रॉयला माघारी धाडले. त्यानंतर डेविड मलान आणि जोस बटलरने संघाचा डाव सावरला. या दोघांनी 130 धावांची खेळी केली. मात्र भुवीने ही जोडी फोडत भारतीय संघाला सामन्यात आणले. भुवीन आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 15 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तीन अर्धशतकासह स्पर्धेत सर्वाधिक 172 धावा करणाऱ्या विराट कोहलीला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT