Virat Kohli And Pujara File Photo
क्रीडा

IND vs ENG : किंग कोहलीनं केली पुजाराची पाठराखण

सध्याच्या घडीला भारतीय संघात विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पुजाराचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराची पाठराखण केलीये. खेळातील उणीवा भरुन काढण्याची जबाबदारी ही त्या-त्या खेळाडूची असते. त्यामुळे पुजारावर टीका करणाऱ्यांनी त्याच्या खेळाच्या शैलीचा निर्णय त्याच्यावरच सोडायला हवा, असे विराटने म्हटले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पुजाराचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही त्याच्या संथ खेळीवर नेहमीच टीका होताना दिसते. पुजाराने 86 सामन्यात 6267 धावा केल्या आहेत. मॅचवेळी पुजारा अधिकच बचावात्मक भूमिका घेतो, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागते, असे आरोपही पुजारावर झाले आहेत. त्याच्या बचावात्मक खेळ शैलीमुळे समोरच्या फलंदाजावरील दबाव वाढतो, असेही अनेकांचे मत आहे.

किंग कोहलीला मात्र असे अजिबात वाटत नाही. त्याने मध्यफळीतील भरवशाच्या फलंदाजाची पाठराखण केलीये. कोहली म्हणाला की, मागील काही काळापासून पुजाराच्या संयमी खेळीबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. तो अनुभवी आणि प्रतिभावंत खेळाडू आहे. उणीवा भरुन काढण्यासाठी आपण त्याला मोकळीक दिली पाहिजे.

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, या स्तरावर खेळत असताना प्रत्येक खेळाडूला आपल्या जबाबदारीची जाणीव असते. संघातील सर्वच याबाबत जागरुकही असतात. संघासाठी कोणती गोष्ट उपयोगी आहे आणि कोणती गोष्ट अनावश्यक आहे हे माझ्यासह इतर खेळाडूंना समजते. पुजारावर टीकेचा काहीही परिणाम होत नाही, असेही विराट यावेळी म्हणाला.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनसंदर्भात विराट कोहलीने अधिक बोलणे टाळले. मात्र यावेळी त्याने शार्दुल ठाकूरवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूर सर्व प्रकारात खेळण्यासाठी फिट असल्याचे विराटने म्हटले आहे. शार्दुल ठाकूर हा चांगला आणि उपयुक्त अष्टपैलू होऊ शकतो, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केलाय. पहिल्या कसोटीसाठी शार्दुलला प्लेइंग इल्वेहनमध्ये संधी मिळणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT