dhanashree verma dance in ireland sona kitna sona hai  sakal
क्रीडा

''सोना कितना सोना हैं'' म्हणत धनश्री आयर्लंडच्या रस्त्यावरच थिरकली

धनश्रीने आयर्लंडच्या रस्त्यावर डान्स करताना एक इन्स्टाग्रामवर रील बनवला आहे.

Kiran Mahanavar

india vs ireland: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये बर्मिंगहॅम येथे १ जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळल्या जाणार आहे. याआधी टीम इंडियाने आयर्लंड दौरा संपला. कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही मालिका 2-0 अशी खिशात घातली. विजयानंतर खेळाडू कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसले. टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही सध्या आयर्लंडमध्ये आहे. धनश्रीने आयर्लंडच्या रस्त्यावर डान्स करताना एक इन्स्टाग्रामवर रील बनवला आहे. तिचा हा रील प्रचंड व्हायरल होत आहे.(dhanashree verma dance in ireland sona kitna sona hai)

धनश्री वर्माने गोविंदाच्या ''सोना कितना सोना है'' या गाण्यावर डान्स केला आहे, हा व्हिडिओ आतापर्यंत लाखाहून जास्त लोकानी पाहिला आहे, आणि हा व्हिडिओही सातत्याने आजून व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी धनश्री तिचा पती चहल आणि टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत डब्लिनमध्ये फिरत होती. डब्लिनमध्ये मजा करताना त्यांचे फोटो तिघांनी सोशल मीडिया शेअर केले आहे. धनश्री वर्मा एक प्रोफेशनल डान्सर आणि कोरिओग्राफर आहे, ती सतत तिचे डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. धनश्री वर्मानेही युझवेंद्र चहलच्या सोबतने अनेक रील तयार केले आहे.

सामान्याबद्दल बोलायच झाल तर, भारताने दोन सामन्यांची टी-20 मालिका क्लीन स्वीप करून जिंकली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक हुडाने 57 चेंडूत 104 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 6 षटकार आणि 9 चौकार लगावले. संजू सॅमसनने 77 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने 7 बाद 225 धावा केल्या. प्रत्युत्तर आयर्लंडने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि अखेरीस 5 गडी गमावून 221 धावा केल्या. आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने 37 चेंडूत 60 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT