Asian Games 
क्रीडा

Asian Games 2023 Ind vs Mal : पावसामुळे सामना रद्द, रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत मारली मजल

Kiran Mahanavar

India vs Malaysia Asian Games 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाचा हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. मलेशियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 173 धावा केल्या. पावसामुळे सामना 15 षटकांचा करण्यात आला आणि प्रत्युत्तरात मलेशिया संघाला दोन चेंडूत केवळ एक धाव करता आली. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि भारताने चांगल्या रँकिंगच्या आधारे उपांत्य फेरी गाठली.

सततच्या पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि आता सामना रद्द करण्यात आला आहे. चांगल्या रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल मानांकित टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्याची संधी मिळाली.

मलेशियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर बंदीमुळे हा सामना खेळू शकली नाही आणि स्मृती मंधानाने संघाची कमान सांभाळली.

भारताने प्रथम फलंदाजी करत शानदार सुरुवात केली. मात्र, स्मृती मानधना 16 चेंडूत 27 धावा करून बाद झाली. पावसामुळे सामना प्रत्येकी 15 षटकांचा करण्यात आला. अशा परिस्थितीत शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी शानदार फलंदाजी करत 86 धावांची भागीदारी केली. शेफाली 39 चेंडूत 67 धावा करून बाद झाली.

शेफाली 39 चेंडूत 67 धावा करून बाद झाली. जेमिमाने 29 चेंडूत 47 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. शेवटी ऋचा घोषने सात चेंडूत नाबाद 21 धावा करत भारताची धावसंख्या 173/2 पर्यंत नेली.

डकवर्थ लुईस नियमानुसार मलेशियासमोर 15 षटकांत 177 धावांचे लक्ष्य होते. मलेशियाने दोन चेंडूत एक धाव घेतली होती, मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. शेवटी सामना रद्द झाला आणि भारतीय संघाने चांगल्या रँकिंगच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली. आता टीम इंडिया 24 सप्टेंबरला सेमीफायनल सामना खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT