India vs Netherlands 23rd Match Super 12 Group 2
India vs Netherlands 23rd Match Super 12 Group 2  esakal
क्रीडा

IND vs NED T20WC22 : फिरकीपुढे नेदरलँडचा डाव गडगडला; भारताचा 56 धावांनी मोठा विजय

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Netherlands T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने सुपर 12 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा 56 धावांनी पराभव करत सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर ग्रुप 2 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थान देखील पटकावले. भारताकडून विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी (62) खेळी केली. तर सूर्यकुमार यादव (51) आणि रोहित शर्माने देखील (53) धावांचे योगदान दिले. भारताने 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडने 20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल, अश्विन, भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारताने टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडविरूद्ध 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. भारताची रन मशिन पुन्हा एकदा भरात आली असून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र सलामीवीर केएल राहुलला नेदलँडविरूद्ध देखील मोठी खेळी करण्यात अपयश आहे. तो 9 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 62 धावांची तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली.

101-9  : अर्शदीप सिंगनेही उघडले खाते 

मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरनंतर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने देखील विकेट्सचे खाते उघडले. त्याने लोन वॅन बीकला 3 तर फ्रिड क्लासेनला शुन्यावर बाद करत नेदरलँडचा 9 वा फलंदाज माघारी पाठवला.

 89-7 : शमी - भुवनेश्वरने दिले धक्के

अश्विन पाठोपाठ मोहम्मद शमीने टिम प्रिंगलला बाद करत शंभरच्या आत नेदलँडला सहावा धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वरने एडवर्डला 5 धावांवर बाद करत नेदरलँडचा सातवा आणि वैयक्तिक दुसरा बळी टिपला.

63-5 : अश्विनचा दुहेरी झटका

अक्षर पटेलपाठोपाठ भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने देखील नेदरलँडला धक्के देण्यास सुरूवात केली. त्याने कॉलिन अॅकेरमन आणि टॉम कूपर यांना एकाच षटकात माघारी धाडले.

47-3 : अक्षरने केली दुसरी शिकार

अक्षर पटेलने बास दे लीड्सला 16 धावांवर बाद करत नेदरलँडला तिसरा धक्का दिला.

20-2 : अक्षर पटेलने उडवला त्रिफळा

पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात अक्षर पटेलने मॅक्स ओडोडचा 16 धावांवर त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

11-1 : नेदरलँडला पहिला धक्का 

भारताने विजयासाठी ठेवलेले 180 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँडला तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का दिला. त्याने विक्रमजीत सिंगला 1 धावेवर बाद केले.

सूर्याचे शेवटच्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण 

सूर्यकुमार यादवने डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. भारताने 20 षटकात 2 बाद 179 धावा उभारल्या.

IND 153/2 (17.5) : विराट कोहलीचे सलग दुसरे अर्धशतक

विराट कोहलीने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपले दुसरे अर्धशतक ठोकत भारताला 150 च्या पार पोहचवले. त्याने सूर्यकुमार यादवसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.

 84-2 : रोहित अर्धशतकी खेळी करून झाला बाद 

पॉवर प्लेमध्ये फक्त 32 धावा करणाऱ्या भारताने त्यानंतर आपली धावगती वाढवण्यास सुरूवात केली. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत भारतला 12 षटकात 84 धावांपर्यंत पोहचवले. मात्र 39 चेंडूत 53 धावा करणारा रोहित शर्मा 12 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.

IND 32/1 (6) : पॉवर प्लेमध्ये भारताची संथ सुरूवात

भारताला पॉवर प्लेमध्ये 1 फलंदाज गमावून 32 धावाच करता आल्या.

11-1 : भारताला पहिला धक्का 

नेदलँडच्या वॅन मीकेरेनने भारताला पॉवर प्लेच्या तिसऱ्या षटकातच पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर केएल राहुला 9 धावांवर बाद केले. राहुल पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात देखील 8 चेंडूत 4 धावा करून स्वस्तात माघारी परतला होता.

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

नाणेफेकीस उशीर 

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या दक्षिण आफ्रिका बांगलादेश या पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे तो सामना अजून संपलेला नाही. याच मैदानावर भारत आणि नेदरलँड भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याच्या नाणेफेकीस उशीर होण्याची शक्यता आहे.

सामन्यावर पावसाचे सावट

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज दोन सामने होत आहेत. पहिल्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे दुसऱ्या भारत विरूद्ध नेदरलँड सामन्यावर देखील पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT