India vs New zealand 1st test match preview by sunandan lele
India vs New zealand 1st test match preview by sunandan lele  
क्रीडा

INDvsNZ : खेळपट्टीच अशी आहे की फलंदाजांची वाट लागणार आहे, का बरं?

सुनंदन लेले

वेलिंग्टन : 5 दिवसांच्या क्रिकेट सामन्याला ‘कसोटी’ का म्हणतात हे भारत आणि न्यूझीलंडच्या संघातील फलंदाजांना समजणार आहे. वेलिंग्टन शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या आणि सुंदर निसर्गाने नटलेल्या बेसीन रिझर्व्ह मैदानावर पहिला कसोटी सामना चालू होताना फलंदाजांच्या पोटात गुरगुरत आहे. कसोटी सामन्याकरता तयार केलेल्या खेळपट्टीचा रंग बघून दोनही बाजूचे वेगवान गोलंदाज जिभल्या चाटत आहेत आणि फलंदाज ‘ऑल इज वेल’चे उसने अवसान आणत आहेत.

न्यूझीलंडकडे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री सारखे तर भारताकडे जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि महंमद शमीसारखे दर्जेदार गोलंदाज फलंदाजांची परीक्षा बघायला तयार होऊन बसले आहेत. नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिली गोलंदाजी घेईल असे हे वातावरण आहे. 

बेसीन रिझर्व्ह मैदानावर फलंदाजी करताना फलंदाजांसमोर काय आव्हाने असतील असा प्रश्न विचारला असता केन विल्यमसन म्हणाला, ‘‘चेंडूवर चकाकी असताना वेगवान गोलंदाजांना मान देऊन खेळावे लागेल. खेळपट्टीवर उभे राहण्याकरता फलंदाजाला त्याची ऑफ स्टंप कुठे आहे याचा बरोबर अंदाज असला तर फार फायदा होईल. या खेळपट्टीवर योग्य प्रकारे चेंडू सोडता येणे ही सुद्धा एक कला असेल. बेसीन रिझर्व्हला वेगवान मारा करणार्‍या गोलंदाजाला स्वींग बरोबर वेग आणि उसळी मिळते. जम बसला की मग त्याच वेग आणि उसळीचा फायदा फलंदाजाला फटकेबाजीकरता घेता येतो असा माझा अनुभव आहे’’, केन विल्यमसनने विचारपूर्वक मुद्दे मांडले.

हाच प्रश्न अजिंक्य रहाणेला विचारला असता तो म्हणाला, ‘‘हे मैदान माझ्याकरता चांगले आहे कारण याच मैदानावर मी कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. या मैदानावर सामना खेळताना केलेल्या सरावाचा उपयोग होत नाही असे नाही पण मैदानावर वातावरण बदलत असताना ऐन वेळेस मूळच्या तंत्रात काय बदल करता याला महत्त्व असते. हे असे मैदान आहे जिथे वारा चालू झाला की फलंदाजाने चेंडू खेळण्याअगोदर पवित्रा घेताना उचललेली बॅट वार्‍याने हेलकावे खाते. मग अशा वेळी तंत्राचा विचार बंद करून गरजेच्या बदलांना अंगीकारावे लागते. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या दोन दिग्गज फलंदाजांनी बेसीन रिझर्व्हवर फलंदाजी करताना असा अनुभव घेतल्याचे मला सांगितले आहे’’, अजिंक्य रहाणे म्हणाला. 

सामना शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता चालू होणार आहे. ‘‘भारतात कसोटी सामना खेळताना 11.30वाजता उपहाराची सुट्टी होते. इथे सगळेच बदलावे लागणार आहे मला. मी रात्री 11.30 -12 वाजेपर्यंत जागून मग सकाळी थोडा उशिराने उठणार आहे. तसे बघायला गेले तर लहान मुलीचा बाप झाल्यापासून मला जागायची सवय झाली आहे त्याचा फायदा होईल मला’’, अजिंक्य रहाणे हसत हसत म्हणाला.  

बेसीन रिझर्व्ह मैदान इतर मैदानांपेक्षा वेगळे असल्याचे सांगताना अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘‘बरीच क्रिकेट मैदाने मोठ्या स्टँडस्नी वेढलेली असतात. बेसीन रिझर्व्ह सुंदर निसर्गाने वेढलेले आहे. मी तर दोन चेंडूंच्या मधे किंवा नॉन स्ट्रायकींग एंडला उभा असताना क्रिकेटचा विचार टाळून इथला नजारा बघत राहतो. त्यामुळे खेळताना मला दडपण जाणवत नाही की थकवाही येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT