India vs New Zealand 2nd Tests Twitter
क्रीडा

Video : पटेलची हिरोगिरी; एकाच षटकात पुजारा-कोहली झिरोवर तंबूत

पुजारा 5 चेंडू खेळूनही खाते उघडू शकला नाही. दुसरीकडे विराट कोहलीही 4 चेंडूचा सामना करुन शून्यावर बाद झाला.

सुशांत जाधव

India vs New Zealand, 2nd Test Day 1 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडेच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. पण शुबमन गिल परतल्यानंतर अजाझ पटेलने एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला तंबूत धाडले. 30 व्या षटकात दोघेही तंबूत परतले. पुजारा 5 चेंडू खेळूनही खाते उघडू शकला नाही. दुसरीकडे विराट कोहलीही 4 चेंडूचा सामना करुन शून्यावर बाद झाला.

चेतेश्वर पुजारा पहिल्या कसोटी सामन्यातही नावाला साजेसा खेळ करु शकला नव्हता. दुसरीकडे विराट कोहली विश्रांतीनंतर मुंबई कसोटी सामन्यातून कमबॅक करत आहे. विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा विश्वास सलामी जोडीनं बऱ्यापैकी सार्थ ठरवला. मयंक आणि शुबमनने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. ही जोडी अजाझ पटेलनं फोडली. शुबमनला त्याने 44 धावांवर माघारी धाडले.

त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेला पुजाराही त्याच्यासमोर गडबडला. ही गोष्ट कमी होती की काय म्हणून कर्णधारही एकाही धावेची भर न घालता माघारी फिरला. पहिल्या तिन्ही फंलदाजाना बाद करुन पहिल्या दिवशी अजाझ पटेलने हिरोगिरी दाखवून दिलीये. कोहली दमदार कमबॅक करेल अशी आशा होती. मात्र त्याची सुरुवात शून्यातून झाल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT