India vs New Zealand 2nd ODI  esakal
क्रीडा

IND vs NZ 2nd ODI : रोहित शर्माचे दमदार अर्धशतक; लंकेपाठोपाठ न्यूझीलंडविरूद्धची मालिकाही खिशात

अनिरुद्ध संकपाळ

India vs New Zealand 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्स राखून पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 109 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. भारताकडून रोहित शर्माने 50 चेंडूत 51 धावांची दमदार खेळी केली. तर शुभमन गिलने नाबाद 40 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर 21व्या षटकातच शिक्कामोर्तब केले.

भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 108 धावात गुंडाळले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याला हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2 तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या.

भारताचा मालिका विजय

शुभमन गिलने विजयी चौकार मारत भारताचा विजय निश्चित केला. भारताने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

 98-2 : भारताला दुसरा धक्का

भारताला विजयासाठी अवघ्या 11 धावांची गरज असताना सँटनरने विराट कोहलीला 11 धावांवर बाद केले.

रोहित शर्माचे दमदार अर्धशतक 

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभम गिलने न्यूझीलंडचे 109 धावांचे आव्हान पार करताना 72 धावांची सलामी दिली. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत 50 चेंडूत 51 धावांची खेळी केली. मात्र अर्धशतकानंतर तो बाद झाला.

न्यूझीलंडचा डाव 108 धावात संपुष्टात 

103-8 : न्यूझीलंडचा संघ अडचणीत

न्यूझीलंडचा संघ 15 धावात माघारी गेल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मायकेल बार्सवेल यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. दोघांनी संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. मात्र ही जोडी मोहम्मद शमीने फोडली. त्याने बार्सवेलला 22 धावांवर बाद केले.

त्यानंतर फिलिप्सने सँटनरसोबत भागीदारी रचत न्यूझीलंडला शतकी मजल मारून दिली. मात्र त्यानंतर पांड्याने सँटनरला 22 धावांवर बाद केले. पाठोपाठ फिलिप्स 36 धावा करून बाद झाला.

 15-5 (Tom Latham, 10.3) : निम्मा संघ गारद 

पहिल्या 5 षटकात शमी अन् सिराजने न्यूझीलंडच्या वरच्या फळीला भगदार पाडल्यानंतर हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर या दुसऱ्या वेगवान जोडीने न्यूझीलंडला अजून धक्के दिले. पांड्याने डेव्हॉन कॉनवॉयला 7 तर शार्दुल ठाकूरने कर्णधार टॉम लॅथमला अवघ्या 1 धावेवर बाद करत किवींची अवस्था 10 षटकात 5 बाद 15 धावा अशी केली.

9-3 : किवींचे 10 धावांच्या आत 3 फलंदाज गारद

मोहम्मद शमीने सातव्या षटकात डॅरेल मिचेलला अवघ्या 1 धावेवर बाद करत किवींची अवस्था 3 बाद 9 धावा केल्या.

 8-2  : हेन्री निकोलसही माघारी 

मोहम्मद शमी नंतर मोहम्मद सिराजने देखील किवींना धक्का दिला. त्याने हेन्री निकोलसला 2 धावांवर बाद केले.

0-1 : मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात दिला धक्का

मोहम्मद शमीने फिन अॅलनचा शुन्यावर त्रिफळा उडवत भारताला पहिल्याच षटकात पहिले यश मिळवून दिले.

भारताने नाणेफेक जिंकली

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT