india vs new zealand sakal
क्रीडा

IND vs NZ : पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल! कॅप्टन धवन 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता ?

कर्णधार शिखर धवन दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये करणार मोठे बदल

Kiran Mahanavar

India vs New Zealand 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे 27 नोव्हेंबरला हॅमिल्टनच्या मैदानावर खेळल्या जाणार आहे. भारतीय संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता यानंतर कर्णधार शिखर धवन दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमधून अनेक स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

युजवेंद्र चहलला संपूर्ण टी-20 विश्वचषक स्पर्धेत संधी मिळाली नाही. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत तो आपल्या लय मध्ये दिसला नाही. त्याच्याविरुद्ध विरोधी फलंदाजांनी भरपूर धावा केल्या आणि टीम इंडियाच्या पराभवाचे ते मोठे कारण होते. किवी संघाविरुद्ध त्याने 10 षटकात 68 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. अशा स्थितीत दुसऱ्या वनडेत कर्णधार शिखर धवनला बेंच स्ट्रेंथ आजमावायला आवडेल. युझवेंद्र चहलच्या जागी तो कुलदीप यादवला संधी देऊ शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शार्दुल ठाकूर वाईटरित्या फ्लॉप ठरला. गोलंदाजी आणि फलंदाजीत तो अप्रतिम खेळ दाखवू शकला नाही. फलंदाजी करताना त्याने केवळ 1 धाव काढली. त्याचबरोबर गोलंदाजीतही तो महागडा ठरला. त्याने 9 षटकात 63 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला. अशा स्थितीत त्याच्या जागी दीपक चहरला दुसऱ्या वनडेत संधी दिली जाऊ शकते.

दीपक चहर हा खेळाडू आहे जो किलर बॉलिंग आणि धडाकेबाज फलंदाजीत माहिर आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने बॅटने 180 धावा केल्या आहेत, ज्यात 2 झंझावाती अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT