India vs New Zealand 2nd Odi sakal
क्रीडा

IND vs NZ 2nd ODI : अशी असेल भारताची Playing 11, उपकर्णधारालाच बेंचवर बसवणार?

हा सामना रद्द झाला, तर शेवटच्या सामन्यात टीम इंडिया फक्त...

Kiran Mahanavar

India vs New Zealand 2nd Odi : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी हॅमिल्टन येथे खेळल्या जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे, अशा परिस्थितीत टीम इंडियाला मालिका जिंकण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे लागतील. पण दुसऱ्या वनडेपूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे, ज्यामुळे न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगू शकते. पहिल्या सामन्यातील कामगिरी न करणाऱ्या अनेक खेळाडूंना दुसऱ्या सामन्यात बेंचवर बसावे लागण्याची शक्यता आहे. यात शार्दुल ठाकूर आणि संघाचा उपकर्णधार ऋषभ पंतचा देखील समावेश असू शकतो.

टीम इंडियाने न्यूझीलंड दौऱ्यावर आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांपैकी 2 सामने पावसाने धुवून गेले. रविवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचा धोका आहे. हवामान खात्यानुसार रविवारी हॅमिल्टनमध्ये होणाऱ्या सामन्याच्या वेळी पावसाची 100 टक्के शक्यता आहे. उभय संघांमधील हा सामना न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी 2 वाजता आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता होणार आहे.

भारताची संभाव्य Playing 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत / दीपक हुड्डा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर / दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

टीम इंडियाला वनडे मालिका काबीज करायची असेल तर हा सामना कोणत्याही किंमतीला जिंकावा लागेल. पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर शेवटच्या सामन्यात टीम इंडिया फक्त मालिका बरोबरीत आणण्यासाठी खेळेल, अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.

  • वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

    शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र सिंह, चहल. कुलदीप यादव.

  • वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ -

    फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टॉम लॅथम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT