India vs New Zealand esakal
क्रीडा

India vs New Zealand : मालिकेत जिवंत राहण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याची मोठी खेळी! प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल

भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा 21 धावांनी पराभव झाला. आज दुसरा टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालिकेत जिवंत राहण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्या मोठी खेळी खेळणार आहे. (India vs New Zealand 2nd T20 Jitesh Sharma playing 11 Hardik Pandya )

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ वॉशिंग्टन सुंदरला अर्धशतक करता आले. पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.

अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत असून स्फोटक फलंदाजीत माहिर आहे. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे.

आयपीएलचे मैदान गाजवले

आयपीएलमध्ये जितेश शर्माने पंजाब किंग्सकडून खेळताना चांगलेच मैदान गाजवले. संघाकडून जितेशने १२ सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान, २३४ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ३४ बॉलमध्ये ४४ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीने हार्दिक पांड्या त्याला संधी देऊ शकतो.

जितेश शर्माने 2013-14 विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले आणि पहिल्या दोन हंगामात विदर्भासाठी केवळ मर्यादित षटकांचे सामने खेळले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2015-16 मध्ये तो तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 143.51 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT