IND vs NZ 3rd ODI LIVE
IND vs NZ 3rd ODI LIVE ESAKAL
क्रीडा

IND vs NZ 3rd ODI : कॉन्वेचा कडवी झुंज मोडून काढत भारताचा किवींना व्हाईट वॉश; रँकिंगमध्ये पटकावले अव्वल स्थान

अनिरुद्ध संकपाळ

India Vs New Zealand 3rd ODI : भारताने न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव करत मालिका 3 - 0 अशी जिंकली. भारताच्या 386 धावांचा पाठलाग करताना डेवॉन कॉन्वेच्या झुंजार 136 धावांच्या जोरावर किवींनी कडवी झुंज दिली. मात्र त्यांना 41.2 षटकात सर्वबाद 295 धावांपर्यंतच मजल मारता आली.

शार्दुल ठाकूरने किवींना पाठोपाठ धक्के देत भारताला विजयपथावर आणले. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 295 धावात माघारी परतला. भारताकडून शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करत किवींसमोर 385 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 112 धावांची तर रोहितने 101 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनी भारताला 212 धावांची सलमी दिली. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. अखेर हार्दिक पांड्याने स्लॉग ओव्हरमध्ये 54 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 350 च्या पार पोहचवले.

230-6 : उमरानने मोठा अडसर केला दूर 

पहिल्या स्पेलमध्ये धावांची खैरात वाटणाऱ्या उमरान मलिकने दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र भारताला मोठा दिलासा दिला. त्याने 100 चेंडूत 138 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या डेवॉन कॉन्वेला बाद केले.

200-5 : शार्दुलने किवींना लावला ब्रेक 

शार्दुल ठाकूरने ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद करत वैयक्तिक तिसरा बळी टिपला आणि किवींना पाचवा धक्का दिला.

184-4 : शार्दुल ठाकूरने दिले पाठोपाठ दोन धक्के

शतकवीर कॉन्वेला चांगली साथ देणाऱ्या डॅरेल मिचेलला शार्दुल ठाकूरने 24 धावांवर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शार्दुलने कर्णधार टॉम लॅथमला शुन्यावर बाद केले. शार्दुल ठाकूर हॅट्ट्रिक चान्सवर होता. मात्र ग्लेन फिलिप्सने चेंडू खेळून काढून शार्दुलला हॅट्ट्रिकची संधी दिली नाही.

NZ 175/2 (24) : डेवॉन कॉन्वेच्या शतकाने टीम इंडियाचे टेन्शन वाढले

हेन्री निकोल्स बाद झाल्यानंतर सलामीवीर डेवॉन कॉन्वेने किवींच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 71 चेंडूत शतकी खेळी करत न्यूझीलंडला 24 षटकात 175 धावांपर्यंत पोहचवले.

106-2 : अखेर कुलदीपने शतकी भागीदारी रचणारी जोडी फोडली

डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्सने दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी रचली. अखेर कुलदीपने हेन्री निकोल्सला 42 धावांवर बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

 73-1 (10 Ov)न्यूझीलंडची दमदार सुरूवात 

हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात फिन अॅलनला शुन्यावर बाद करत किवींना पहिला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्सने चांगली फलंदाजी करत न्यूझीलंडला 10 षटकात 1 बाद 73 धावा केल्या

313-6 : भारताची मदार आता पांड्यावरच 

विराट कोहली 36 धावा करून बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव देखील 14 धावांची भर घालून परतला. हार्दिक पांड्याने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने भारताला 300 च्या पार पोहचवले. मात्र सुंदरही 9 धावा करून बाद झाला.

भारताला चौथा धक्का! विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये

284 धावांच्या स्कोअरवर भारताला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली 27 चेंडूत 36 धावा करून बाद झाला आहे. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. भारताची धावसंख्या 37 षटकांत 4 बाद 291 अशी आहे.

भारताची पडली तिसरी विकेट

इशान किशन 24 चेंडूत 17 धावा करून धावबाद झाला आहे. 268 धावांच्या स्कोअरवर भारताची तिसरी विकेट पडली. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला.

भारताची धावसंख्या अडीचशेच्या पुढे

भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांच्या पुढे गेली आहे. विराट कोहली आणि इशान किशन क्रीजवर आहेत. रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर भारताचा धावसंख्येचा वेग मंदावला असला तरी हे दोघेही भारतीय डावाला चालना देत भारताला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रोहित पाठोपाठ शुभमन गिलही आऊट

रोहित पाठोपाठ शुभमन गिलही आऊट झाला आहे. 230 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल 78 चेंडूत 112 धावा करून बाद झाला. त्याने 13 चौकार आणि पाच षटकार मारले.

भारताची पहिली विकेट पडली

212 धावांवर भारताची पहिली विकेट पडली आहे. कर्णधार रोहित शर्मा शतकी खेळी करून बाद झाला. रोहितने 85 चेंडूत 101 धावा केल्या. त्याला मायकल ब्रेसवेलने क्लीन बोल्ड केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि सहा गगनचुंबी षटकार मारले.

शुभमन गिल शतक

रोहित शर्मानंतर शुभमन गिलनेही आपले शतक पूर्ण केले आहे. गिलचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. त्याने 84 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावली आहेत. टीम इंडियाच्या धावसंख्येने 200 धावा ओलांडल्या असून भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

 9 चौकार-6 षटकार 15 चेंडूत 72 धावा! कर्णधारने ठोकले शानदार शतक

भारतीय कर्णधार रोहित शर्माने 83 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने तीन वर्षानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. या शतकासह त्याने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. रोहित आणि पाँटिंग या दोघांनी वनडेमध्ये 30 शतके झळकावली आहेत. गिलही शतकाच्या जवळ आहे. भारताच्या धावसंख्येने बिनबाद 200 धावा ओलांडल्या आहेत.

भारताची धावसंख्या 200 धावा पार 

भारताने बिनबाद 200 धावा केल्या आहेत.

भारताची धावसंख्या दीडशेच्या पुढे

भारताच्या धावसंख्या 150 धावा पार झाल्या आहे. शुभमन गिल आणि रोहित शर्मा खूप टचमध्ये दिसत आहेत. दोघेही चांगली फलंदाजी करत आहेत. दोन्ही फलंदाज आपापल्या शतकाकडे वेगाने वाटचाल करत आहेत. यासह भारतीय संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.

कर्णधारने ठोकले शानदार अर्धशतक

रोहित शर्माने 41 चेंडूत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने एका षटकारासह 50 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने आतापर्यंत आपल्या खेळीमध्ये 7 चौकार आणि 5 षटकार मारले आहे. त्याने 12 चेंडूत 58 धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या 110 च्या पुढे गेली आहे.

10 चेंडूत 44 धावा! न्यूझीलंडविरुद्ध गिलने ठोकले शानदार अर्धशतक

शुभमन गिलने अवघ्या 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेत त्याने द्विशतकही ठोकले आहे.

4, 4, 4, 6, 4 इंदूरमध्ये पण गिलचा तांडव! एका षटकात ठोकल्या 22 धावा

भारतीय डावाची पहिली 10 षटके संपली आहेत. टीम इंडियाने कोणतेही नुकसान न करता 82 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल आक्रमक फलंदाजी करत आहेत. गिल 29 चेंडूत 41 तर रोहित 31 चेंडूत 39 धावा करून नाबाद आहे.

 भारताच्या 50 धावा पूर्ण

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. आठव्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर शुभमन गिलने लॉकी फर्ग्युसनला चौकार मारून भारताला 50 धावांच्या पुढे नेले.

भारताच्या डावाला सुरुवात

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल क्रीझवर आला आहे. न्यूझीलंडसाठी जेकब डफीने गोलंदाजीची सुरुवात केली.

जाणून घ्या भारताची Playing-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.

न्युझीलंडने जिंकले नाणेफेक

इंदूरमध्ये नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. भारताने दोन बदल केले आहेत. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दोघांच्या जागी उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला संघात ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT