Memes
Memes Sakal
क्रीडा

IND vs NZ : सुर्यकुमार यादवचा 360° जलवा! ट्वीटरवर मीम्सने केला कहर

सकाळ डिजिटल टीम

IND vs NZ : आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा टीट्वेंटी सामना पार पडला. पहिला सामन्यातील पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला होता. तर या सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाला अक्षरश: पाणी पाजले. तर सुर्यकुमार यादवने आपलं शतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या ५१ चेंडूमध्ये १११ धावा करत विक्रम केला आहे. सुर्याच्या या खेळीनंतर ट्वीटरवर मीम्स व्हायरल झाले आहेत.

(Suryakumar Yadav Twitter Viral Video)

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १९१ धावा बनवल्या. यामध्ये सुर्यकुमार यादव याच्या १११ धावांचे योगदान होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला फक्त १२६ धावांपर्यंत पोहोचता आलं. या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडला आपले सर्व गडी गमवावे लागले. तर यानंतर ट्वीटरवर मीम्स व्हायरल झाले आहेत.

सुर्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अक्षरश: धुलाई केल्याचं या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं. त्यावरून मिर्झापूर वेब सिरीजमधील फोटो वापरून तयार केलेले मीम्स व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर रजनीकांत यांच्या एका चित्रपटातील सीन वापरूनही मीम्स तयार करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT