India vs New Zealand esakal
क्रीडा

India vs New Zealand: रांचीतील खेळपट्टीमुळे दोन्ही कर्णधार चकित; म्हणाले...

भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाहुण्या संघाने भारताचा २१ धावांनी पराभव केला.

सकाळ डिजिटल टीम

रांची, ता. २८ : भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाहुण्या संघाने भारताचा २१ धावांनी पराभव केला आणि तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याप्रसंगी दोन्ही संघांच्या कर्णधारांकडून (हार्दिक पंड्या आणि मिचेल सँटनर) रांचीमधील खेळपट्टीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. (India vs New Zealand T20 pitch report Mitchell Santner Hardik Pandya)

भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने दवाचा क्रिकेटच्या चेंडूवर होणारा परिणाम विचारात घेऊन नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकांमध्ये १७६ धावांपर्यंत मजल मारली. भारताची गोलंदाजी म्हणावी तशी प्रभावी झाली नाही, मात्र धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी चांगलेच सतावले.

मात्र, रात्री खेळविण्यात येणाऱ्या कुठल्याही सामन्यात दुसऱ्या डावात क्रिकेटचा चेंडू मोठ्या प्रमाणात वळत नाही आणि यामुळेच भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या व न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हार्दिक पंड्या म्हणाला, ‘‘आमच्या संघातील किंवा न्यूझीलंडमधील कोणत्याच खेळाडूला रात्री खेळविण्यात येणाऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात चेंडू एवढ्या मोठ्या प्रमाणात वळेल असे वाटत नव्हते. आम्ही पराभवाला कारणे शोधत बसणार नाही.

न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आमच्यापेक्षा जास्त चांगला खेळ केला म्हणून ते सामन्यात विजयी झाले. नवीन चेंडू हा जुन्या चेंडूपेक्षा जास्त वळत होता. तो चेंडू कधीही उसळी खात होता, हे सर्वच आमच्या फलंदाजांसाठी आश्चर्याचे होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT