Ind vs Pak Asia Cup 2022 
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा विजयी षटकार; भारताच्या विजयाची 5 कारणे

आशिया चषक स्पर्धेत भारताने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून केला पराभव

Kiran Mahanavar

Ind vs Pak Asia Cup 2022 : भारताने आशिया कप 2022 ची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला.

भारताच्या विजयाची पाच कारणे

पॉवर प्लेमध्ये चांगला मारा - पॉवरप्लेमध्ये भारताने पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला आहे. रिझवानला पहिल्याच षटकात भुवनेश्वरने जवळपास बाद केले. पण रिव्ह्यूमुळे तो वाचला. मात्र, तिसऱ्या षटकात भुवीच्या शॉर्ट पिच बॉलवर कर्णधार बाबर आझमने आपली विकेट गमावली. पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फखर जमानची विकेट गेली. भुवी आणि आवेशला यश मिळाले आहे.

हार्दिक पांड्याची जादू - भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली. . हार्दिक पांड्याने 25 धावात 3 तर भुवनेश्वर कुमारने 26 धावात 4 बळी टिपले. तर या दोघांना अर्शदीपने 2 तर आवेश खानने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

भुवनेश्वर कुमारची घातक गोलंदाजी - भारताचा अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आज आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने पाकिस्तानकडून चार विकेट घेतल्या. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, आसिफ अली, शादाब खान आणि नसीम शाह यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने आज आपल्या स्पेलमध्ये 26 धावांत चार विकेट घेतल्या. या शानदार गोलंदाजीनंतर तो पाकिस्तानविरुद्ध टी20 मध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज बनला आहे.

विराट कोहलीची अडखळती पण धावा करून देणारी खेळी - भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात पुनरागमन करत होता, सर्वांच्या नजर त्याच्याकडे लागल्या होती. दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीला जीवदान मिळाले, त्यानंतर तो रंगात परतताना दिसला. आधी षटकार मारला आणि नंतर काही चौकार मारले. मात्र पुन्हा एकदा त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करता आले नाही. विराट कोहलीने 34 चेंडूत 35 धावा करून झेलबाद झाला.

रविंद्र जडेजा - हार्दिक पांड्याची भागीदारी - हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यात पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करून भारताला विजयापर्यंत नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT